Pune Crime News | पुणे-चंदननगर क्राईम न्यूज : तुझ्या व्यवसायाची वाट लावेल ! सुपरवायझरने मालकाला मागितली 50 लाखांची खंडणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कंपनीतील कामगारांच्या पगारासाठीचे पैसे चोरुन नेऊन कंपनीचा सर्व डाटा माझ्याकडे आहे. तुझ्या व्यवसायाची वाट लावून टाकीन, अशी धमकी देऊन सुपरवायझरनेचे (Supervisor) मालकाकडे 50 लाख रुपयांची खंडणी (Extortion Cases) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत दिनेश वासु शेट्टी (वय ६४, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विश्वास धोंडु राऊत Vishwas Dhondu Raut (वय ४०, रा. गणेश चाळ, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ पासून आतापर्यंत सुरु होता. (Pune Crime News )

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मास्टर प्रो फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी (Masterpro Facility Services Private Limited) आहे. कंपनीमध्ये विश्वास राऊत हा सुपरवायझर म्हणून काम करीत होता. कंपनीच्या खराडी (Kharadi) येथील गेरा स्काय व्हिला (Gera Kky Villa) अपार्टमेंट टॉवरमधील कार्यालयात असलेल्या कॅश लॉकरमध्ये कामगारांचे पगार देण्यासाठी 2 लाख 54 हजार रुपये ठेवले होते. ते पैसे राऊत याने चोरले. कंपनीतील गोपनीय कागदपत्रे कस्टमर डाटा चोरुन नेला. त्यानंतर सेल्स ऑफिसजवळ येऊन फिर्यादी यांना तुझ्या कंपनीचा सर्व डाटा माझ्याकडे आहे. तुझ्या व्यवसायाची वाट लावून टाकील व तुझ्या मुलाला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. हे सर्व थांबावायचे असेल तर 50 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा (FIR) दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक घोडके (PSI Ghodke) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Pune-Chandananagar Crime News: Your business will wait! The supervisor demanded a ransom of 50 lakhs from the owner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

Unseasonal Rains In Pune | अलर्ट ! आगामी 2 दिवस पावसाचे, पुणेकरांनी घ्यावी काळजी