Pune Crime News | पुणे शहरातील झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून एकाच वेळी 12 गुन्हेगार तडीपार (हद्दपार)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलातील झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी स्वारगेट पोलिस स्टेशन (Swargate Police Station), सहकानगर पोलिस स्टेशन (Sahakar Nagar Police Station), भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन (Bharti Vidyapeeth Police Station), कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन (Koregaon Park Police Station), लष्कर पोलिस स्टेशन (Lashkar Police Station) आणि बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या (Bundgarden Police Station) हद्दीतील 12 गुन्हेगारांना (Criminals On Pune Police Record) हद्दपार केले आहे. (Pune Crime News)

खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder), दरोडा (Dacoity Cases) , खंडणी (Extortion Cases), विनयभंग (Molestation Case), दरोडयाची तयारी, दंगा, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, साथीचे रोग परसविण्याचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, फौजदारीपात्र कट करणे, दुखापत, जबरी चोरी (Robbery In Pune), बेकायदेशीर हत्यार बाळगणे, जुगार (Gambling) अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव अन् वचक रहावा म्हणून झोन-2 च्या हद्दीतील सर्वच पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडून (Police Inspectors) पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे तडीपार प्रस्ताव पाठविण्यात आले होते. उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी प्रस्तावाची तात्काळ चौकशी पुर्ण करून तब्बल 12 गुन्हेगारांना एकाच वेळी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Police) व पुणे जिल्हयातून (Pune Rural Police) तडीपार केले आहे. (Pune Crime News)

तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सुरज ताजमोहंमद सिद्दीकी
Suraj Tajmohammad Siddiqui (20, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी, पुणे), सहकारनगर पोलिस स्टेशनच्या
हद्दीतील विवेक बाबुराव चोरगे Vivek Baburao Chorge (23, रा. घर नं. 262, वृदांवन बिल्डींग शेजारी, प्रेमचंद सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी, पुणे), धीरज रंगनाथ आरडे Dheeraj Ranganath Aarde (25, रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे), गणेश सुनिल मोरे Ganesh Sunil More (26, रा. संभाजीनगर, धनकवडी, पुणे), किरण वामन जगताप Kiran Vaman Jagtap (25, रा. तळजाई वसाहत, पद्मावती), भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तानाजी राजाभाऊ जाधव
Tanaji Rajabhau Jagtap (38, रा. आयप्पा मंदिराजवळ, संतोषनगर, कात्रज), प्रदिप रामा जाधव
Pradeep Rama Jadhav (29, रा. जांभुळवाडी रोड, कात्रज), गणेश विजय भंडलकर Ganesh Vijay Bhandalkar (21, रा. संतोषनगर, कात्रज), कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आदित्य उर्फ दिनेश युवराज ओव्हाळ
Aditya Alias Dinesh Yuvraj Oval (22, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क, पुणे),
सागर कल्याण माने Sagar Kalyan Mane (30, रा. कोरेगाव पार्क), लष्कर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील
आरबाज हसन कुरेशी Arbaz Hasan Qureshi (23, रा. जाफरीन लेन, अल कुरेशी हॉटेल पाठीमागे, पुणे)
आणि बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रोहन उर्फ मच्छी मल्लेश तुपघर
Rohan Alias Machhi Mallesh Tupghar (23, रा. भिमटोला व नवरत्न तरूण मित्र मंडळाजवळ, 13 ताडीवाला रोड, पुणे) यांचा समावेश आहे.

सदरील कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. झोन-2 च्या हद्दीतील रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांवर यापुढे
देखील अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action By Pune City Police) करण्यात
येणार असल्याचे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले आहे.

Advt.

Web Title :  Pune Crime News | Pune City Zone-2 Deputy Commissioner of Police Smartana Patil simultaneously tadipar (deportation) of 12 criminals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pandharpur Ashadhi Wari 2023 | आषाढी वारीत ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यास बंदी

Maharashtra Cabinet Expansion | शिवसेना वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार? भाजपच्या 6 व शिवसेनेच्या 4 जणांना स्थान मिळण्याची शक्यता

Corruption In Maharashtra Education Department | राज्यातील ‘त्या’ सर्व शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या उघड चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे अ‍ॅन्टी करप्शनला पत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ