Pune Crime News | पुण्यातील तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | पुणे पोलीस आयुक्तालयातील (Pune Police Commissionerate) परिमंडळ चारच्या हद्दीतील येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.23) राजीव गांधी नगर येथे केली. एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. (Pune Crime News)

येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) हद्दीतील सराईत गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख याला परिमंडळ- 4 पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Commissionerate) आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. (Pune Crime News)

गुरुवारी दरोडा व वाहन चोरी पथक 2 चे पथक येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे व गणेश लोखंडे यांना माहिती मिळाली की, येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख हा राजीव गांधी नगर, येरवडा येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने राजीव गांधी नगर परिसरात सापळा रचून आरोपी शेख याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मुंबई पोलीस (Mumbai Police) अधिनियम कलम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड (Senior PI Nandkumar Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी पथक 2 च्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग

FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Pune PMC News | ‘माननीया’च्या आशिर्वादाने अभियंत्याला दोन मलईदार खात्यांची ‘जहागीरी’ ! अभियंत्याच्या ‘कतृत्वाने’ दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली