Pune Crime News | पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर शिवीगाळ, तरुणावर FIR; वाघोली येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तसेच हिंदू देवी-देवतांना सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 6 ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास वाघोली येथे घडला आहे. (Pune Crime News)

सागर सावंत (वय-21 रा. निओ सिटी मागे, बी.जे.एस. कॉलेज वाघोली) याच्यावर आयपीसी 295 (अ) नुसार गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रविंद्र दिलीप पडवळ (वय-30 रा. वडकी गाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्य़ादीनुसार, आरोपी सागर सावंत याने फिर्यादी यांच्या बीड येथे राहणाऱ्या मित्राच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर (Instagram Post) कमेंट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच हिंदु देवी-देवतांबद्दल अश्लील विधान केले. आरोपीने हिंदुंच्या धार्मिक भावनांचा अपमान करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी यांनी याबाबत तक्रार देताच पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील सहायक पोलीस निरीक्षक भालेराव (API Bhalerao) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बिबवेवाडी परिसरात महिलेचा विनयभंग करुन मुलाला मारहाण, 4 जणांवर FIR

Rohit Pawar on Ajit Pawar | ‘आत्मक्लेश करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाणांच्या छायाचित्रासमोर बसा!’, रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्याचा आईचा आनंद क्षणात दु:खात बदलला, अर्ध्यावाटेतच मुलाने घेतला जगाचा निरोप; बारामतीमधील दुर्दैवी घटना

हप्ता मागून मध्यस्थीला जिवे मारण्याचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

‘इंस्टा’वर अश्लील भाषेत शिवीगाळ ! क्लासला जाणार्‍या 21 वर्षीय तरूणीचा पाठलाग करून विनयभंग; 31 वर्षीय युवकावर येरवडयात गुन्हा