Pune Crime News | पुणेः हडपसर पोलिस स्टेशनच्या अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीतून बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीचे पलायन, पोलिसांना धक्का देवून काढला पळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बलात्काराच्या गुन्हयात अटकेत (Arrest In Rape Case) असलेल्या आरोपीने पोलिसांना धक्का देवून पलायन केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हडपसर पोलिस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीत (Magarpatta Police Chowki) घडली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

प्रितम चंदुलाल ओसवाल Pritam Chandulal Oswal (32, रा. देवाची उरूळी, ता. हवेली, जि. पुणे) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्हयात पोलिसांनी प्रितम ओसवाल याला दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी अटक केली होती. तो सध्या पोलिसांच्या कस्टडीत होता. (Pune Crime News)

पोलिसांनी आरोपी प्रितम ओसवाल याला सोमवारी सायंकाळी तपासकामी मगरपट्टा पोलिस चौकीत नेले होते. त्यावेळी त्याने पोलिसांना धक्का देवून पलायन केले आहे. प्रितम ओसवाल याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) यांनी केले आहे.

प्रितम चंदुलाल ओसवालचे वर्णन खाली प्रमाणे आहे.

वय 32 वर्षे

रंगाने – सावळा, अंगाने – जाड,

डोळे – मोठे, चेहरा – गोल , उजव्या हातावर ‘आई’ गोंदलेले

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MLA Rohit Pawar | प्रफुल्ल पटेलांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या दाव्यावर रोहित पवारांचे जोरदार प्रतिउत्तर; “आमच्याकडे शरद पवार…”

Pune Crime News | 50 लाखांची खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड

Elle Macleman | ‘या’ पध्दतीनं कधीही घालू नका Underwear, भयंकर इन्फेक्शनचा वाढू शकतो धोका;
जाणून घ्या बचावाची पद्धत