Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कोथरुड परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध (Pune Minor Girl Rape Case) ठेवले. यातून पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणावर कोथरुड पोलीस ठाण्यात (Pune Police) पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 जुलै 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत कोथरुड येथील सुतारदरा येथे आरोपीच्या घरी घडला. (Pune Crime News)

याबाबत वारजे माळवाडी येथे राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुरुवारी (दि.7) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन संतोष कोकरे Santosh Kokre (वय-20 रा. सुतारदरा, कोथरुड) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 506 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, असे म्हणत तिला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवले. त्यानंतर मुलीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिला या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर घरच्यांना सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड (PSI Rathod) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

विक्रीसाठी गांजा बाळगला, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; साडे सात लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा दहशतवाद विरोधी पथकाकडून पर्दाफाश

नवाब मलिक महायुतीत नको, आमचा तीव्र विरोध, देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना पत्र

हातात स्टेथोस्कोप, अंगावर ॲप्रॉन, आमदार धंगेकर डॉक्टरांच्या वेशभूषेत पोहचले विधानभवनात

इझी पे कंपनीची साडे तीन कोटींची फसवणूक, एजंटच्या साथीदारंना परराज्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची कारवाई