Pune Crime News | महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी करुन विनयभंग, 4 जणांवर FIR; कोरेगाव पार्क येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधून तिच्याकडे शारीरिक संबंधाची (Physical Relationship) मागणी करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह चार जणांवर विविध कलमांसह अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये रविवारी (दि.8) दुपारी साडेचार ते पाच या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या 25 वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष वामनराव भरेकर (Santosh Vamanrao Bharekar) व त्याची पत्नी, मित्र राहुल शिवाजी जाधव व एका अनोळखी व्यक्ती विरोधात आयपीसी 354, 323, 504, 506, 34, अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या कौटुंबिक कारणामुळे पतीपासून विभक्त राहत आहेत.
महिलेची आरोपी संतोष व त्याचा मित्र राहुल यांच्यासोबत ओळख होऊन मैत्री झाली होती.
आरोपी संतोष याने महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न केला.
तसेच महिलेसोबत अश्लील चाळे करुन शारीरिक संबंधाची मागणी केली.
शारीरिक संबंध ठेवले नाही तर बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिली. (Pune Crime News)

पीडित महिलेने याबाबत आरोपी संतोष याच्या पत्नीला सांगितले. दरम्यान, फिर्यादी रविवारी दुपारी कोरेगाव पार्क
येथील हॉटेलमध्ये मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी आरोपी संतोष याच्या पत्नीने हॉटेलमध्ये जाऊन फिर्यादी यांना जातिवाचक शिवीगाळ करुन हाताने
मारहाण (Beating) केली. तसेच त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय सुर्वे (ACP Sanjay Surve) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पीपीपी तत्वावर क्रेडिट नोटच्या बदल्यात महामंदवाडी आणि मुंढव्यातील रस्ते विकसित होणार; पुणे महापालिकेने 170 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या

Pune Pimpri Chinchwad Fire News | पुण्यात टँकरला लागलेल्या भीषण आगीनंतर हवेत मोठे स्फोट, चार स्कूल बस जळाल्या, भीतीमुळे लोकांमध्ये घबराट