Pune Crime News | पुण्यासह राज्यात दरोडा, घरफोड्या करणारा रेकॉर्डवरील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड, 9 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यासह महाराष्ट्रातील वेग-वेगळ्या जिल्ह्यांमध्ये दरोडा (Robbery) व घरफोड्या (Burglary) करणारा रेकॉर्डवरील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला (Most Wanted Criminal) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट सहाच्या (Unit-6) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून 9 गुन्हे उघडकीस आणून 2 लाख 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) 26 ऑगस्ट रोजी करण्यात आली.

सोनु उर्फ संजिव कपुरसिंग टाक Sonu aka Sanjiv Kapoor Singh Tak (वय-28 रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) आयपीसी 454,457,380,411,34 नुसार गुन्हा (FIR) दाखल आहे. तसेच राज्यातील वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यात तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. (Pune Crime News)

पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी (Vehicle Theft) गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष मोहिम राबवून गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास युनिट सहाचे पथक करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंडे (Police Officer Nitin Munde) यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार संजिव टाक हा मांजरी बुद्रुक येखील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.

युनिट सहाच्या पथकाने मांजरी येथील स्मशानभूमीजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तसेच हा गुन्हा साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले.
आरोपींची पोलीस कोठडीमध्ये चौकशी केली असता हा गुन्हा पंकजसिंग दुधानी Pankaj Singh Dudhani
(रा. अंबरनाथ) याच्या मदतीने केल्याचे सांगितले. आरोपीने सोने-चांदीचे दागिने (Gold and Silver Jewellery)
तसेच रोख रक्कमेची (Cash) चोरी केलेली ठिकाणी पोलिसांना दाखवली. पोलिसांनी गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीने पुणे शहरातील विमानतळ (Viman Nagar Police Station), हडपसर (Hadapsar Police Station),
लोणीकंद (Lonikand Police Station), लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच आरोपीवर राज्यातील कराड (Karad Police Station), रोहा (Roha Police Station), सावर्डे
(Sawarde Police Station), मानवत (Manawat Police Station), माणगाव (Mangaon Police Station),
पाली (Pali Police Station), महाड (Mahad Police Stations), रायसोनी (Raisoni Police Station),
अंबरनाथ पोलीस ठाण्यात (Ambernath Police Station) गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात तो फरार होता.

आरोपीने गुन्ह्यातील सोन्याची अंगठी आईला दिल्याने तिचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीला 1 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके (PSI Bhairavanath Shelke) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल (Senior PI Rajnish Nirmal),
पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय (PSI Suresh Jaibhai) पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके,
विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले,
ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे,
अशफाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | उदय सामंतांच्या ‘त्या’ आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार; म्हणाले “दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी…”

Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार