Pune Crime News | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार, महिलांसह 8 जणांवर FIR; नाना पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकावर (Senior Citizens) कोयत्याने वार (Stabbing) केले. तर त्यांच्या बहिणीच्या जावयाच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार नाना पेठेत (Nana Pethe) घडला आहे. याप्रकरणी पाच महिलांसह तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) नाना पेठेतील जय भीम मित्र मंडळासमोर रविवारी (दि.29) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडला.

 

वेदांत कांबळे, अनिकेत भिंगारे, विजय माने, अनिकेत भिंगारे याची आई व इतर चार महिलांवर समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) आयपीसी 143, 146, 147, 149, 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी अशोक धोंडीराम मोरे (वय-60 रा. भारत टॉकीज समोर, नाना पेठ) यांनी सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा नातु साहिल शेवाळे (वय-16) याच्यासोबत जुन्या वादाच्या कारणावरुन वाद घालून त्याला माराहण केली.
त्यावेळी आरोपी अनिकेत भिंगारे याची आई व इतर 3-4 महिला त्या ठिकाणी आल्या.
त्यांनी फिर्यादी यांच्या बहिणीच्या मुली पुजा व ऋतुजा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे भांडण सोडवण्यासाठी अशोक मोरे गेले असता अनिकेत भिंगारे याच्या आईने कोयत्याने (Koyta) डोक्यात वार करुन जखमी केले.
त्यावेळी फिर्यादी यांच्या बहिणीचे जावई सचिन शेवाळे हे भांडण सोडवण्यासाठी आले
असता विजय माने याने त्यांच्या डोक्यात जड वस्तू मारुन जखमी केले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोणारे (API Lonare) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Senior citizen stabbed with a spear when he went to settle a fight, FIR against 8 including women; Incidents in various areas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Annie Wersching | हॉलीवुडच्या ‘या’ अभिनेत्रीचे कॅन्सरने निधन; वयाच्या 45 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 15 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime News | जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक