पुणे : Pune News | शहरातील किमान तापमानात झालेली वाढ आता हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे थंडीची चाहुल लागली आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात अजून काहीशी घट होऊ शकते, असे हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे. यामुळे ऑक्टोबर हिटचा (October Hits) चटका कमी होईल आणि गारठा काहीसा वाढू शकतो. (Pune News)
पावसाने रजा घेतल्यानंतर शहरात गेल्या आठवडाभरापासून किमान तापमानात वाढ झाली होती. सरासरीपेक्षा किमान तापमानात ३ अंशांनी वाढ झाली होती. त्यामुळे किमान तापमान हे साधारणपणे २० अंशांच्या पुढे नोंदले जात होते.
सोमवारी शहरात १८.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. यंदा ऑक्टोबरमधील हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमी किमान तापमान आहे. आतापर्यंत ऑक्टोबरमध्ये शहरात १९ अंशांपर्यंतच्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, बहुतांश वेळा किमान तापमान हे २० अंशांपुढेच कायम होते.
रविवारी किमान तापमानात ४ अंशांनी वाढ झाली होती. कमाल तापमानातही चढ-उतार सुरू असून उन्हाच्या झळा आणि उकाडा जाणवत होता. (Pune News)
पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.
तर शहरात येत्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानात साधारणपणे १ ते २ अंशांनी आणखी घट होण्याची चिन्हे आहेत,
अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
राज्याची स्थिती पाहिली तर राज्यात सुद्धा बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट होत आहे.
सोमवारी राज्यातील नीच्चांकी तापमानाची नोंद जळगाव येथे १५ अंश सेल्सिअस इतकी झाली.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तेज चक्रीवादळाच्या पाठोपाठ
आता बंगालच्या उपसागरातही चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची
प्रणाली सक्रिय असून याची तीव्रता वाढत आहे. परिणामी, मंगळवारी या प्रणालीचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते.
ही प्रणाली पुढे बांगलादेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. याचा महाराष्ट्राला धोका नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा