Pune Crime News | फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजविणार्‍या शेखर खवळे स्थानबध्द ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत MPDA कायद्यान्वये 43 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फरासखाना पोलिस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीत दहशत माजविणार्‍या शेखर रविंद्र खवळे Shekhar Ravindra Khawle (23, रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे-माळवाडी, पुणे) याच्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये (MPDA Act) कारवाई करून त्याला स्थानबध्द केले आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत एमपीडीए अन्वये 43 कारवाया केल्या आहेत. (Pune Crime News)

शेखर रविंद्र खवळे हा वारजे माळवाडी (Warje Malwadi Police Station) व फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता, गुप्ती, सुरा यासारख्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे, विनयभंग यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्यावर 4 गंभीर गुन्हयांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल म्हणून नागरिक त्याच्याविरूध्द उघडपणे तक्रार करीत नव्हते. (Pune Crime News)

खवळे याच्याविरूध्द स्थानबध्दतेची कारवाई व्हावी यासाठी पोलिस आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याची छाननी करून त्याच्यावर आयुक्तांनी एमपीडीएची कारवाई केली आहे. त्याच्या वर्षभरासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) स्थानबध्द करण्यात आले आहेत. फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा (Sr PI Dadasaheb Chudappa), गुन्हे शाखेतील पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए.टी. खोबरे (Sr PI A.T. Khobre) यांनी खवळेला स्थानबध्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आणि छाननी केली.

Advt.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 43 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्यांना
स्थानबध्द केले आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई सराईत गुन्हेगारांवर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | विश्रांतवाडी: टिंगरेनगरमध्ये वडिलाचा मुलाने केला खून

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 कडून अट्टल वाहन चोरास अटक

वडिलांच्या परस्पर फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने घेतले 1 कोटी 20 लाखांचे कर्ज