Pune Crime News | धक्कादायक! नाना पेठेत तरुणीला भररस्त्यात मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीला रस्त्यात अडवून तिला हाताने मारहाण करुन धमकी (Threat) दिल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नाना पेठेतील होप हॉस्पिटलसमोर (Hope Hospital) 23 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा च्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत काशेवाडी भवानी पेठ (Bhawani Peth) येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) मंगळवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत संजय कांबळे Prashant Sanjay Kamble (वय-20 रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 354b ड, 341, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.
याचा राग आरोपीच्या मनात होता. पीडित तरुणी नाना पेठेतील (Nana Peth) हॉप हॉस्पिटल समोरून जात
असताना आरोपीने तिला आडवले. लग्नास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तरुणीचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग (Molestation) केला. तरुणीला कॅम्प चौकात चलण्यास सांगितले असता तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या प्रशांत कांबळे याने तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तु माझी झाली नाही तर कोणाची होवू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव (PSI Yadav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde-Dhananjay Munde | मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर, पंकजा यांच्या मिश्किल टिप्पणीला उपस्थितांची दाद, ”आज पारा जरा जास्तच…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | क्रेडीटवर हायड्रोलिक मशीन घेऊन पावणे सहा कोटींची फसवणूक, महाळुंगे परिसरातील प्रकार

Mrunal Thakur Airport Look | एअरपोर्टवर ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली मृणाल ठाकूर, पाहा व्हायरल कॅज्यूअल लूक…

Shahrukh Khan Spotted At Airport | एअरपोर्टवर किलर लूकमध्ये दिसला शाहरूख खान, एका झलकसाठी चाहत्यांना लागलं वेड…