Pankaja Munde-Dhananjay Munde | मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर, पंकजा यांच्या मिश्किल टिप्पणीला उपस्थितांची दाद, ”आज पारा जरा जास्तच…”

बीड : Pankaja Munde-Dhananjay Munde | आज परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंडे भाऊ-बहिण, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चेहèयावरही हास्य उमटले. (Pankaja Munde-Dhananjay Munde)

कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या, मी जेव्हा आज मंचाकडे बघत होते, तेव्हा मला फार गरम होत होते. मला वाटले आत्ता डिसेंबरच्या महिन्यात एवढे गरम का होत आहे? मग माझ्या लक्षात आले की शिंदे, पवार आणि फडणवीस हे तिघेही परळीच्या या एका मंचावर आले आहेत. पण त्याहीपेक्षा येथे थोडा पारा जास्तच वाढला आहे. कारण धनंजय मुंडे व पंकजा मुंडेही एकाच मंचावर आले आहेत. पंकजा मुंडे यांनी अशी कोपरखळी मारताच एकच हशा पिकला. (Pankaja Munde-Dhananjay Munde)

पंकजा मुंडे म्हणाल्या, मला माध्यमांनी विचारले की ताई या कार्यक्रमात तुम्ही आलात हे प्रमुख आकर्षण आहे का?
मी म्हटले येथे जे बसले आहेत, त्यांच्याकडे बघता माझ्याकडे संवैधानिक अशी कोणतीही भूमिका नाही.
पण जिल्ह्याची पाच वर्षं पालकमंत्री म्हणून काम करत असताना मनापासून इच्छा होती की वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा.

फडणवीस मुख्यमंत्री असताना या योजनेचे आम्ही बीजारोपण केले. पण काही कारणास्तव ती योजना पुढे जाऊ शकली नाही.
मी धनंजयचे अभिनंदन करते की आता ही योजना पुढे जाईल. त्यासाठी २८६ कोटी रुपयांचा निधी आहे.
मी एवढेच सांगेन की अत्यंत चांगले काम या माध्यमातून व्हावे.

मुख्यमंत्र्यांना आवाहन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, माझी मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे.
आता भाजपाचे तिनही राज्यांमध्ये सरकार आले आहे. त्यापैकी मध्य प्रदेशमधील लाडली बहना, तिथल्या
ओबीसी आरक्षणाचाही विषय त्यांनी मार्गी लावला. हे प्रश्न आपणही मार्गी लावले, तर सरकारला या लोकांच्या
दारापर्यंत यायची गरज पडणार नाही. हे लोक दारात येऊन आपल्याला पुन्हा संधी देतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस

सोसायटीच्या चेअरमन पदावरुन दोन ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Bhidewada Smarak | पुणे महापालिकेने अवघ्या चोवीस तासात ऐतिहासिक भिडे वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली; मध्यरात्री धोकादायक वाडा पाडल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना चपराक