Pune Pimpri Chinchwad Crime News | क्रेडीटवर हायड्रोलिक मशीन घेऊन पावणे सहा कोटींची फसवणूक, महाळुंगे परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कंपनीचा विश्वास संपादन करुन फर्मसाठी क्रेडिटवर सहा कोटी रुपयांच्या सहा मशीन खरेदी केल्या. परंतु त्यातील केवळ प्रोसेसिंग फी चे (Processing Fees) पैसे देऊन कंपनीची पावणे सहा कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2019 ते आज पर्यंत चाकण आणि हैदराबाद येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबबत अमित सिंह कुशवाह Amit Singh Kushwaha (वय-46 रा. पॅनकार्ड रोड, बाणेर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून कृष्णराव (रा. प्रुदवी ग्रेनाईट फर्म, केपीएचबी जवळ, हैदराबाद, तेलंगणा) याच्यावर आयपीसी 420, 421, 422, 406 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णराव हा प्रुदवी ग्रेनाईट्स फर्म हैदराबाद
(Prudhvi Granites Firm Hyderabad) या कंपनीचा भागीदार आहे. त्याने फिर्यादी यांच्या सॅनी हेव्ही इंडस्ट्रीज इंडिया
(SANY Heavy Industry India Pvt Ltd) या कंपनीकडून 6 कोटी 40 लाख 74 हजार रुपयांच्या
Hydraulic Excavator SY380 या सहा मशीन क्रेडीवटर खरेदी केल्या.
मात्र, आरोपीने खरेदी केलेल्या मशिनचे पैसे फिर्यादी यांना दिले नाहीत.
त्यामुळे फिर्यादी यांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली असता आरोपीने प्रोसेसिंग फी 69 लाख 30 हजार 61 रुपये फिर्यादी यांना दिले.

आरोपीने उर्वरित रक्कम परत केली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी पैसे लवकरात लवकर द्या अन्यथा मशिन परत करा
असे कृष्णराव यांना सांगितले. मात्र, आरोपीने कंपनी मशिन घेऊन जाऊ नये म्हणून त्या लपवून ठेवल्या.
आरोपीने मशिनचे उर्वरित 5 कोटी 77 लाख 74 हजार रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस

सोसायटीच्या चेअरमन पदावरुन दोन ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Bhidewada Smarak | पुणे महापालिकेने अवघ्या चोवीस तासात ऐतिहासिक भिडे वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली; मध्यरात्री धोकादायक वाडा पाडल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना चपराक