Pune Crime News | पुण्यात धक्कादायक प्रकार! टायरला 16 पंक्चर असल्याचे भासवून फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोकांना फसवण्यासाठी भामट्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवली जात असते. नवनव्या पद्धतीमुळे लोक देखील त्या जाळ्यात अडकून आपलं आर्थिक नुकसान करवून घेत असतात. पुण्यामध्ये देखील असाच एक फसवणुकीचा (Fraud) प्रकार समोर आला असून चक्क टायर पंक्चर (Tire Puncture) असल्याचे सांगत वाहनचालकाकडून 1600 रुपये उकळण्यात आले. गाडी पंक्चर असल्याचे सांगून वाहन चालकाला पंक्चरच्या दुकानात नेऊन फसवणूक करण्याचा नवा प्रकार पुण्यात घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी नरेश पाल (रा. रा. एसएमक्यू नंबर 79/2, विसावा कॉम्प्लेक्स, एअरफोर्स स्टेशन, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तीन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 420, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे नगर रोडवरील रामवाडी जकात नाका ब्रिज जवळ 28 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विमाननगर येथून कमांड हॉस्पिटल (Command Hospital) येथे जात होते. त्यावेळी जकात नाका ब्रिजजवळ त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने फिर्य़ादी यांना त्यांच्या दुचाकीच्या मागील चाकात हवा कमी असल्याचे सांगून समोरील पंक्चर दुकानावर जाण्यास सांगितले. फिर्यादी हे पंक्चर दुकानात गेले असता त्याठिकाणी दोन अनोळखी व्यक्ती बसले होते. नरेश पाल यांच्या गाडीचा टायर तेथील तीन आरोपींनी तपासला. त्यांची गाडी पंक्चर असल्याचे त्यांना खोटे सांगितले. टायरमध्ये सोळा पंक्चर असल्याचे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले.

फिर्यादी यांना तातडीने रुग्णालयात जायचे असल्याने त्यांनी पंक्चर दुरुस्ती करायला सांगितले. आरोपींनी 16 पंक्चर काढल्याचे
सांगून त्यांच्याकडून 1600 रुपये उकळले. दुसऱ्या दिवशी त्यांनी ओळखीच्या पंक्चर दुकानात जाऊन गाडी दाखवली.
त्याने टायर पाहिल्यानंतर पूर्ण टायरच खराब झाल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी
येरवडा पोलीस ठाण्यात (Pune Police) धाव घेत तक्रार दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Sr PI Balkrishna Kadam) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून आत्येभावाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील बँकेची 21 लाखांची फसवणूक