Pune Crime News | पगार दिला नाही म्हणून दुकान मालकावर कोयत्याने वार, चार जणांवर FIR; आंबेगाव येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दुकानात काम करणाऱ्या कामगाराने पगार दिला नाही म्हणून दुकान मालकावर कोयत्याने वार केले. तसेच दुकानाची तोडफोड करुन नुकसान केले. हा प्रकार आंबेगाव बु. (Ambegaon Bk) येथील सनब्राईट शाळेजवळ मंगळवारी (दि.12) रात्री सातच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत ओंकार रामदास ठुले (रा. सुतारदरा, पौड रोड, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर गणेश बाबु गोरे (Ganesh Babu Gore), अमर अशोक निर्सगंध (Amar Ashok Nisargandha), सोन्या अशोक निर्सगंध (Sonya Ashok Nisargandh), विशाल रायकर (Vishal Raikar) यांच्यावर आयपीसी 326, 324, 323, 452, 504, 506/2, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सनब्राईट शाळेजवळ दुकान आहे. आरोपी गणेश गोरे हा त्यांच्या दुकानात कामाला होता. मंगळवारी रात्री सातच्या सुमारास फिर्यादी हे स्टोअरचे काम संपवुन घरी जाण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी आरोपी गणेश गोरे हा त्याच्या साथीदारांसह त्याठिकाणी आला. त्याने पगार का दिला नाही अशी विचारणा करुन फिर्यादी यांना धक्का दिला. तसेच जबरदस्तीने दुकानात घुसून तोडफोड केली.

तर त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण करुन पगार दिला नाहीतर
जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
आरोपी अमर निर्सगंध याने कोयता उलट्याबाजुने मारून फिर्यादी यांच्यावर वार करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament |
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन