Pune Crime News | ‘तू भाई आहे का’ म्हणत एसटी चालकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात घातला दगड, लोणी काळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रिक्षाला पाठीमागुन धडक देऊन रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना पुणे सोलापूर रोडवरील (Pune Solapur Road) कदमवाकवस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी एसटी चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि.27) सकाळी अकराच्या सुमारास एच.पी. गेट नंबर दोन समोर घडली. (Pune Crime News)

एसटी चालक योगेश सिद्धेश्वर खडके ST Driver Yogesh Siddeshwar Khadke (रा. भांडगाव ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर आयपीसी 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रिक्षाचालक हसन समशेर पठाण (वय-40 रा. इनामदार वस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हसन पठाण हे पुणे सोलापूर रोडवरुन त्यांची रिक्षा घेऊन जात होते.
एच.पी. गेट नं. 2 समोर एसटी बसची धडक फिर्यादी यांच्या रिक्षाला पाठीमागून बसली. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी एसटी बस चालक योगेश खडके याला गाडी हळु चालवता येत नाही का, माझ्या रिक्षाला धडक का दिली अशी विचारणा केली. याचा राग आल्याने एसटी चालकाने तुला गाडी निट चालवता येत नाही का, तु काय भाई आहे का, मला गाडी चालवायला शिकवतो का असे म्हणत फिर्य़ादी यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन एसटी बसमधील दगड हसन पठाण यांच्या डोक्यात घालून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका, ”असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक”

Ajit Pawar Group | अजित पवार गटाचे विधीमंडळाच्या नोटिसीला 260 पानी उत्तर, राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याचा केला दावा

Pune Pimpri Crime News | पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत, घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या; दोघांना अटक