Pune Crime News | विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगून तरुणीचा विनयभंग, पुण्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगून एका तरुणीचा भररस्त्यात विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गणेशखिंड रस्त्यावर घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केतन कुलकर्णी याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरुणी पीएमपी बसमधून (PMP Bus) गणेशखिंड रस्त्यावर उतरली. आचार्य आनंदऋषीजी चौकातून (विद्यापीठ चौक) ती रात्री आठच्या सुमारास विद्यापीठात जात होती.

तरुणी रस्ता ओलांडत असताना आरोपी कुलकर्णी याने तिला अडवले. विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे त्याने तिला सांगितले. कुलकर्णीने तिला मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर आरोपीने तिच्याशी असभ्य वर्तन केले. घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत कुलकर्णी विरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

खोटे सोन्याचे दागिने तारण ठेऊन फायनान्स कंपनीची फसवणूक, वाघोली परिसरातील घटना; शाखा अधिकाऱ्यासह चार जणांवर FIR

मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 52 वी स्थानबध्दतेची कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाल्यास काय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

जीवे मारण्याची धमकी देऊन मित्रानेच केले तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल, हडपसर परिसरातील घटना

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कोंढवा परिसरातील घटना; आरोपीला अटक

मेट्रो कामगारांचे अपहरण करुन रोकड लुटली, पुण्यातील घटना

Lalit Patil Drug Case | तातडीची शस्त्रक्रिया सांगितली असताना ललित पाटील 10 दिवस वेगवेगळ्या शहरात कसा फिरत होता?, रविंद्र धंगेकरांचा सवाल