Pune Crime News | राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडेंचा जामीन अर्ज फेटाळला, नोकरीच्या आमिषाने 44 जणांना 5 कोटींचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिक्षक (Teacher), आरटीओ (RTO) तसेच नोकरी लावण्याच्या आमिषाने (Lure of Job) 44 जणांकडून तब्बल 5 कोटी उकळल्याच्या आरोपावरून अटक (Arrest) करण्यात आलेल्या (Pune Crime News) राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त (State Examination Council Commissioner) शैलेजा रामचंद्र दराडे Shailaja Ramchandra Darade (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, सुसरोड) यांचा जामीन अर्ज (Bail Application) पुणे लष्कर न्यायालयाने (Lashkar Court) फेटाळला आहे. लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (First Class Judicial Magistrate) डी.जे. पाटील (D.J. Patil) यांनी याबाबत आदेश दिले.

नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात शैलजा दराडे यांच्यासह भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे Dadasaheb Ramchandra Darade (रा. अकोले, ता. इंदापूर) यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) संगणमत करुन फसवणूक (Fraud) व अपहार (Embezzlement) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी Popat Sukhdev Suryavanshi (वय-50 रा. मु.पो. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली होती. (Pune Crime News)

गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलजा दराडे यांना 7 ऑगस्ट रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी जामीन मिळण्यासाठी लष्कर न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केला. दराडे यांच्या जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी (Government Prosecutors) जोरदार विरोध केला. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दराडे यांना जामीन मंजूर झाला तर तपासात बाधा येईल. त्यामुळे जामीन मंजूर करु नये, अशी विनंती सरकारी वकिलांनी युक्तीवादात केली. सरकारी वकिलांचा युक्तीवाद प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.जे. पाटील यांनी ग्राह्य धरुन शैलजा दराडे यांचा जामीन अर्ज फेटाळला.

काय आहे प्रकरण?

फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक असून त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक पदावर नोकरीला लावायचे होते.
त्यासाठी ते विविध ठिकाणी माहिती घेत असताना जून 2019 मध्ये सूर्यवंशी यांची भेट आरोपी
दादासाहेब दराडे यांच्याशी झाली. त्याने बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगितले.
त्यानुसार मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगितले.
आरोपी दादासाहेब याने फिर्यादी यांच्याकडून हडपसरमध्ये 27 लाख रुपये घेतले.
काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी लागली नसल्याने फिर्यादी यांनी पैसे परत मागितले. परंतु त्याने पैसे परत न देता फसवणूक केली. दराडे याने विविध शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 44 जणांची पाच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | … तर राजकारणात सक्रिय व्हायला तयार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचे राजकारणात येण्याचे संकेत

NCP | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे, पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटाकडून नियुक्ती