Pune Crime News | शेळया चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून गजाआड, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करुन तसेच दमदाटी करुन शेळ्या व बोकड चोरून नेणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Pune LCB) अटक केली आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या वेळी इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी बोराटेवस्ती येथे घडली होती. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात (Walchandnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी महादेव चव्हाण (वय- 32 रा. माळीनगर चरववस्ती, ता. माळशिरस) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

वालचंदनगर परिसरात शेळ्या चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. पोलिसांच्या पथकाने भरणेवाडी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करुन संशयित आरोपींच्या हालचाली पडताळून पाहिल्या असता त्यांनीच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. (Pune Crime News)

पोलीस आरोपींचा शोध घेत असताना 25 ऑक्टोबर रोजी पथकाला माहिती मिळाली की, शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या रवी चव्हाण हा बावडा चौकात आला आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने चार साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पथकाने गुन्ह्यतील चोरी केलेल्या शेळ्यांची विक्री करुन आलेले 30 हजार रुपये, 6 शेळ्या, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व त्याच्याकडे मिळालेली दुचाकी असा एकूण 2 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी वालचंदनगर, बारामती तालुका, भिगवण, इंदापूर, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे,
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक
अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील,
पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, अजय घुले, अतूल डेरे,
राजू मोमीण, निलेश शिंदे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,
पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर, पोलीस अंमलदार शैलेश स्वामी, गणेश काटकर, चांदणे, किसन बेलदारे,
गणेश कळसकर यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी सेवानिवृत्त