Pune Crime News | ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचा चोरट्यांचा नवा फंडा! मीठी मारून रोकड केली लंपास; सदाशिव पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Crime News | पुणे शहरामध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने, मॉर्निंग वॉकला जात असताना ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या (Robbing Senior Citizens) घटना घडत आहेत. मात्र सदाशिव पेठेमध्ये (Sadashiv Peth) एका जेष्ठ नागरिकाला लाथ मारून खाली पाडून संत्वन करण्याच्या बहाण्याने वीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) 19 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे तीन ते पावणे पाच दरम्यान घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक (Arrest) केली आहे. (Cheating Case)

याबाबत सुधाकर पांडुरंग भस्मारे Sudhakar Pandurang Bhasmare (वय-63 रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे-Sinhagad Road) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मझर मुमताज अन्सारी (वय-18 रा. सय्यदननगर, हडपसर) याच्यावर आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार एस.पी. कॉलेज रोड जवळ (S.P. College Road) घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवर जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन दोन अनोळखी व्यक्ती आले.
पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या उजव्या पायावर लाथ मारली. त्यामुळे फिर्यादी हे खाली पडले.
त्यानंतर आरोपींनी ‘क्या अंकल, क्या हो गया, धक्का लगा तो नाराज क्यो हो गये’ असे म्हणत त्यांना मिठी मारुन
त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. सांत्वन करत असताना आरोपीने फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातून वीस हजार
रुपयांची रोकड, डेबिट कार्ड (Debit Card), आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card), पत्नीचे आधार कार्ड,
पॅन कार्ड काढून दुचाकीवरुन पळून गेले. फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानेकर (API Nanekar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Big relief for IPS Rashmi Shukla, case related disclosure of confidential report closed

Pune: Deadline for submitting applications to regularise gunthewari constructions may be extended

Bank Holiday In September 2023 | सणांमुळे सप्टेंबर महिन्यात राहणार अनेक दिवस बॅंका बंद; जाणून घ्या बॅंकेचे वेळापत्रक