Pune Crime News | खुनाच्या गुन्हयाच्या जन्मठेपेची शिक्षा झालेला अन् 11 वर्षापासून पॅरोल रजा घेवून फरार झालेल्यासह तिघांना गुन्हे शाखेकडून अटक; 2 पिस्तुलांसह 4 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हिंजवडी पोलिस ठाण्यात (Hinjewadi Police Station) दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयात न्यायालयाने जन्मठेपेचे (Pune Court) शिक्षा सुनावलेल्या आणि शिक्षा भोगत असताना 11 वर्षापासून पॅरोल रजेवर गेल्यानंतर फरार झालेल्या गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट-3 च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 पिस्तुले आणि 4 काडतुसे असा एकुण 1 लाख 20 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

खुशाल चिंधु भुंडे Khushal Chindhu Bhunde (53), अमित बाळासाहेब दगडे Amit Balasaheb Dagde (37) आणि मनिष सहदेव मोरे (Manish Sahdev More) (35, तिघे रा. रा. बावधन, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 5 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हे शाखेतील युनिट-3 चे अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर (Police Santosh Kshirsagar) यांना आरोपी खुशाल भुंडे हा 11 वर्षापासून पॅरोल रजेवर गेल्यापासून फरार असून तो चांदणी चौकातील वेधभवजवळ मित्राची वाट बघत थांबलेला असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News)

प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चांदीण चौकातील वेधभवनजवळ सापळा रचला. त्यावेळी तेथे आलेल्या खुशाल भुंडे, अमित दगडे आणि मनिष मोरे यांना पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 पिस्तुल आणि 4 काडतुसे आढळून आली. पोलिसांनी एकुण 1 लाख 20 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला.

खुशाल भुंडे हा 11 वर्षापुर्वी येरवडा कारागृहातून पॅरोलच्या रजेवर बाहेर पडला आणि फरार झाला. तो बिहार राज्यातील बगाहा येथे पळून गेला होता. त्याने नंतर उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये देखील वास्तव्य केले. दीड महिन्यांपासुन तो पुण्यातील बावधन आणि पिरंगुट परिसरात लपून राहत होता. त्याने उत्तरप्रदेशातून 2 पिस्तुले आणि 4 काडतुसे आणली हाती. आरोपीविरूध्द वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अमित दगडे याच्याविरूध्द यापुर्वी हिंजवडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

सदरील कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,
गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे,
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट,
पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार,
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, संजीव कळंबे,
सुरेंद्र साबळे, सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, प्रकाश कट्टे, साईनाथ पाटील,
प्रताप पडवाळ, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha-MNS Vasant More | पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी?,
2024 च्या लोकसभेसाठी मनसेचे 9 उमेदवार ठरले; ‘येथून’ लढणार?

Maharashtra Vidhan Sabha Elections | पुण्यात विधानसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी !
निष्ठावंत पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे आणि संजय भोसले यांच्यावर जबाबदारी