Pune : मैत्रीणीला त्रास देणार्‍यास विचारला त्यानं जाब, तिघांनी युवकाला केली बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मैत्रिणीला त्रास देणाऱ्या तरुणाला जाब विचारल्याच्या रागातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातील गोखलेनगर परिसरात घडली.

याप्रकरणी धीरज कटीकर (वय 27, रा. वानवडी) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाच्या मैत्रिणीला यातील एक आरोपी फोनकरून त्रास देत होता. त्यामुळे त्याने या तरुणाला माझ्या मैत्रिणीला का त्रास देतो, असे म्हणत जाब विचारला होता. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. दरम्यान फिर्यादी तरुण पाच दिवसांपूर्वी त्याच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने त्याला भेटण्यासाठी पहाटे साडे तीन वाजता गोखलेनगर येथील टाक सराफ लाईन रोड येथून जात होता. यावेळी आरोपींनी त्याला अडविले. त्याची दुचाकी थांबवून त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लाथा-बुक्यांनी मारहाण करत लोखंडी कोयत्याने व बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. टी. पिंगळे हे करत आहेत.