Pune Crime News | हडपसर पोलिसांकडून दोन आरोपींना अटक, घरफोडीचे 4 तर वाहनचोरीचा एक गुन्हा उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या (House Burglary) गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी (Pune Police) एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर एकाला अटक करुन वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दुचाकी जप्त केली आहे. (Pune Crime News)

हडपसर परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एक संशयित अल्पवयीन मुलगा पाण्याची मोटार घेऊन जाताना पथकला दिसला. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दुसऱ्या कारवाईत प्रणव प्रशांत शेजुळ Pranav Prashant Sejul (वय-19 रा. कामठे वस्ती, लोणी काळभोर मुळ रा. श्रीगोंदा, अहमदनगर) याला अटक केली. त्याच्याकडून हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेला वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणून 52 हजार रुपये किंमतीची होंडा अॅक्टीवा (एमएच 12 आर.बी. 3781) जप्त केली आहे. (Pune Crime News)

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग
रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख
(IPS Vikrant Deshkumkh) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke), पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे
(PI Vishwas Dagle), पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivale) यांच्या सुचनेनुसार
सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijayakumar Shinde), पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे
(PSI Avinash Shinde), पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव,
शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसरकर, रशिद शेख यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने 27 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

Manoj Jarange Patil | सरकारकडे जरांगेंची मागणी, जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा

Pune Crime News | प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News | पुणे : ‘मोठ मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना ओळखतो’ म्हणत महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंग करणाऱ्या दोघांवर FIR