Pune Crime News | वानवडी पोलिसांकडून महिलांची सोन साखळी चोरणार्‍यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) महिलांच्या गळयातील सोन साखळी (Chain Snatching) जबरदस्तीने चोरणार्‍या दोघांना अटक केली आहे (Pune Police Arrest Two Chain Snatcher). त्यांच्याकडून 1 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

उदयान दिपक ओव्हाळ Udayan Deepak Oval (24, रा. केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) आणि आकाश सुरेश वाघीरे
Aakash Suresh Waghire (20, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पाठीमागे, शांतीनगर, शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 10 जुलै 2023 रोजी फिर्यादी महिला त्यांचा मैत्रिणीसह मॉर्निंग वॉक (Morning Walk) करून घराकडे परत जात होत्या. त्या दोघी वानवडी परिसरातील मथुरेवाला गार्डनच्या समोर आल्यानंतर चोरटयांनी त्यांच्याकडी सोन साखळी जबरदस्तीने (Robbery In Pune) ओढून चोरून नेली होती. याबाबत पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी घटनास्थळ आणि शिवाजीनगर पाटील इस्टेट (Patil Estate Shivajinagar) दरम्यानचे तब्बल 100 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) तपासले. गुन्हयाच्या तपासाअंती पोलिसांनी उदयान ओव्हाळ आणि आकाश वाघीरे यांना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि गुन्हयातील दुचाकी वाहन असा एकुण 1 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Patare),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विनय पाटणकर (PI Vivek Patankar), तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane), पोलिस हवालदार अमजद पठाण, हरीदास कदम, अतुल गायकवाड, पोलिस अंमलदार अमोल गायकवाड, संतोष नाईक, निलकंठ राठोड, यतिन भोसले आणि सोनम भगत यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | Wanwadi police arrested Two Chain Snatcher

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा