Pune Crime News | पत्नीचा राग लहान मुलीवर, जेवणात चिकन दिले नाही म्हणून मारली वीट; पाषाण परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पत्नीने जेवणात चिकन दिले नाही याचा राग आल्याने पतीने पत्नीचा राग लहान मुलीवर काढला. पतीने जेवणात चिकन दिले नाही म्हणून लहान मुलीच्या डोक्यात विट मारुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील पाषाण परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाषाण येथील वाकेश्वर रोड परिसरात सोमवारी (दि.27) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

विकास नागनाथ राठोड (रा. पुनम बेकरीजवळ, वाकेश्वर रोड, पाषाण) याच्यावर आयपीसी 323, 324 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपीचे सासरे रघुनाथ लालु पवार (रा. वृंदावन सोसायटी, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) बुधवारी (दि.29) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास राठोड याने सोमवारी रात्री पत्नीकडे जेवण मागितले. पत्नीने त्याला जेवायला दिले. मात्र, जेवणात चिकन दिले नाही याचा राग आरोपीला आला. याच कारणवरुन चिडून त्याने तिथे पडलेली वीट लहान मुलीच्या डोक्यात मारली. यामध्ये लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार समजल्यानंतर फिर्य़ादी यांनी आरोपी विरुद्ध बुधवारी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | पुणे : प्रेमविवाहाची इच्छा अधुरी, संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक अपघातात जोडीदाराचा मृत्यू तर तरुणी गंभीर जखमी

Pune Crime News | कन्सलटन्सी कंपनीतील महिलेचा विनयभंग, डेक्कन परिसरातील प्रकार

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात