Pune Crime News | अपहरण करुन खून करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला येरवडा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अपहरण (Kidnapping) करुन खून (Murder In Pune) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून एक लोखंडी कोयता (Koyta) पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) येरवडा येथील खाऊ गल्ली येथे 29 जून रोजी रात्री केली.

निलेश अरुण कोंढवळे Nilesh Arun Kondhwale (वय-27 रा. पारनेर, अहमदनगर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्टनुसार (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलादार स्वप्नील मराठे (Swapneel Marathe) यांना माहिती मिळाली की, खाऊ गल्ली येथे दोन जण दुचाकीवर थांबले असून दुचाकीला नंबर प्लेट नाही. तसेच त्यांची हालचाल संशयास्पद आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी खाऊ गल्ली येथे सापळा रचला. त्यावेळी पोलीस आल्याचे समजताच आरोपीला पळून जात असताना ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ लोखंडी कोयता मिळाला.

आरोपीला येरवडा पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता 28 जून रोजी रात्री 11 च्या सुमारास पिंपरी येथून वाघोलीच्या दिशेने जाणाऱ्या एकावर कट करुन कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत समोर आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) आयपीसी 341, 120(ब), 507, 506, 34 नुसार गुन्हा दाखल आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहायक आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior PI Balkrishna Kadam), पोलीस निरीक्षक गुन्हे जयदिप गायकवाड (PI Jaydeep Gaikwad), पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव (PI Kanchan Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे (PSI Kumar Warangule), उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे (PSI Pradeep Surve), पोलीस अंमलदार गणपत थोकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, अश्विन देठे, सुशांत भोसले, स्वप्निल मराठा, मोहन गिरमे, प्रविण माळे, तेजस पवार, अनिल अहिवळे यांच्या पथकाने केली.

Web Title :   Pune Crime News | Yerwada police arrested the accused in the attempt to kidnap and murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा