Pune Crime | हिंजवडीतील एकाने लावला Flipkart आणि ‘डिलिव्हरी डॉट कॉम’ला सव्वा लाखांचा चुना; ‘मोडस” पाहून पोलीस ‘अवाक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वेगवेगळ्या संस्था आणि लोकांना फसवण्यासाठी (Cheating) लोक काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. पुण्यातील (Pune Crime) हिंजवडीमध्ये (Hinjewadi) राहणाऱ्या एका व्यक्तीने फ्लिपकार्ट (Flipkart) आणि ‘डिलिव्हरी डॉट कॉम’ या दोन वेबसाइटला चक्क सव्वा लाख रुपयांचा गंडा घातला आहे. फ्लिपकार्ट कंपनीला फसविण्यासाठी त्याने वापरलेली मोडस ऑपरेंडीपाहून पोलिस देखील चक्रावले आहेत. या आरोपीला लोणीकंद पोलिसांनी (Loni Kanda Police Station) अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

सुनीलकुमार निरंजनप्रकाश गुप्ता Sunilkumar Niranjanprakash Gupta (वय 55, रा. रिपब्लिक टाऊनशिप, हिंजवडी) असे अटक (Arrest) आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी किरण मल्हारी कांबळे (वय 30 रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोणीकंद येथील गंगा हॉस्पिटल जवळ घडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Inspector of Police Gajanan Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता हा मूळचा उत्तर भारतातील रहिवासी आहे. मागील काही वर्षांपासून तो हिंजवडी परिसरात राहतो. सध्या कोणताही कामधंदा करीत नसलेला गुप्ता हा अशाप्रकारे डिलिव्हरी वेबसाईटला फसवित (Pune Crime) असल्याचे तपासात समोर आले आहे.

 

अशी करत होता फसवणूक

आरोपी गुप्ता याने 13 ऑक्टोबर 2019 रोजी फ्लिपकार्ट या वेबसाइटवरून ऑनलाइन शॉपिंग (Online shopping) केली होती. वेबसाईटवर त्याने सोन्याची एक अंगठी मागवली होती. डिलिव्हरी डॉट कॉम या लॉजिस्टिक कंपनीकडून त्याची ऑर्डर दिलेल्या सोन्याच्या अंगठीची डिलिव्हरी देण्यात आली होती. या लॉजिस्टिक कंपनीच्या डिलिव्हरी बॉयकडून सोन्याच्या अंगठीच्या पार्सलची डिलिव्हरी घेतल्यानंतर त्याने ते पैसे भरले.

 

थोड्या दिवसांनी डिलिव्हरी घेतलेल्या सोन्याच्या अंगठीप्रमाणे हुबेहूब बनावट सोन्याची अंगठी तयार करून घेतली. तसेच ऑनलाइन आलेली पार्सलची ऑर्डर कॅन्सल केली. ही कॅन्सल झालेली ऑर्डर परत घेण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयकडे बनावट सोन्याची अंगठी त्याने दिली. तसेच खरी सोन्याची अंगठी स्वतःकडे लपवून ठेवली. सोन्याची अंगठी परत केल्याचे भासवीत त्याने फ्लिपकार्ट कंपनीकडून स्वतःच्या बँक खात्यावर 41 हजार 670 रुपयांचा रिफंड देखील घेतला. परंतु, ही अंगठी कंपनीकडे परत गेल्यानंतर कंपनीने केलेल्या तपासणीमध्ये गुप्ता याने पाठवलेली अंगठी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कंपनीमार्फत कांबळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये (Loni Kanda Police) तक्रार दाखल केली.

 

डिलिव्हरी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांची एक लाख 22 हजार 648 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुप्ता याला अटक केली आहे.
विशेष म्हणजे पोलिसांना त्याच्याकडे बनावट आधार कार्ड (Fake Aadhaar card) देखील मिळून आले आहे.
त्याने यापूर्वी देखील अशाच प्रकारे सासवड आणि वेगवेगळ्या भागांमध्ये डिलिव्हरी घेऊन त्या रद्द करून
फसवल्याचे प्रकार समोर आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले.

 

Web Title : Pune Crime | One from Hinjewadi planted Flipkart and ‘Delivery.com’ with a quarter of a million lime; Pune Police shocked by modus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा