Pune Crime | पुण्यातील 49 वर्षीय महिलेला गोड बोलून त्यानं नेलं लॉजवर, नवीन साडी नेसताना अन् उतरवताना काढले फोटो

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | एका खासगी कार्यालयात काम करणाऱ्या महिलेसोबत ओळख वाढवून तिला लॉजवर नेले. महिलेला नवी साडी नेसण्यास देऊन साडी नेसतानाचे फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर महिलेचे साडी उतरवतानाचे फोटो काढले. याला विरोध केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार पुण्यातील पुणे स्टेशन येथील एका लॉजवर (Pune Crime) घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) एकावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने महिलेला अंगावरील सर्व कपडे काढण्यास सांगितले. याचे चित्रिकरण करत असताना महिलेने विरोध केला. तेव्हा आरोपीने फोटो व्हायरल (Photo viral) करण्याची धमकी (Threat) दिली. पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत कदम नावाच्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली. बंडगार्डन पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा (Yerwada) येथे राहणारी पीडित 49 वर्षीय महिला एका खासगी कार्यालयात काम करते.
त्याठिकाणी कदम नावाचा व्यक्ती महिलेच्या साहेबांना भेटण्यासाठी आला होता.
परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे साहेबांना भेटता येणार नसल्याचे तिने सांगितले.
यावेळी आरोपीने गोड बोलून महिलेचा फोन नंबर घेतला.
पीडित महिला काम संपवून घरी जात असताना आरोपीने काम असल्याचे सांगून त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

त्यानंतर पीडित महिलेला पुणे स्टेशन येथील होमलँड लॉजमध्ये (Homeland Lodge) घेऊन गेला.
त्याठिकाणी तीला जबरदस्तीने पैसे देऊ केले. परंतु तिने पैसे घेण्यास नकार दिला.
त्यानंतर तिला नवी साडी नेसण्यास दिली. साडी नेसत असताना त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढले.
यानंतर तीला अंगावरील सर्व कपडे काढण्यास सांगून त्याचेही फोटो काढण्यास सुरुवात केली.
मात्र महिलेने त्याला विरोध केला असता त्याने मोबाईल मधील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
पुढील तपास बंडगार्डन पोलीस (Bundgardan Police) करित आहेत.

Web Title :-  Pune Crime | photos taken while wearing and taking off a new sari in close room near pune railway station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण