Pune Crime | गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, प्रचंड खळबळ

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या (Pimpri Chinchwad Police Crime Branch Unit 5) पोलीस शिपायाला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.30) रात्री सव्वाआठच्या सुमारास देहूरोड बाजार (Dehu Road) येथे घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

 

याप्रकरणी मारहाण करणाऱ्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. अरविंद लक्ष्मण ढिल्लोड Arvind Laxman Dhillod (रा. पारशीचाळ, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शंकर गाडेकर Dnyaneshwar Shankar Gadekar (वय-36) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडेकर हे देहूरोड बाजारात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साध्या वेशात गस्त घालत (Pune Crime) होते.
त्यावेळी बालाजी लंच होम येथे आरोपीने शिवीगाळ करुन त्यांच्यासोबत झटापट केली. त्यांना जमिनीवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा (Pune Crime) निर्माण केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ (PSI Sanjay Dhamal) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | pimpri chinchwad crime branch police beaten in pimpri market police arrest one

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PNB MySalary Account | तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये अकाऊंट तर ‘मोफत’ मिळेल 20 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?

PM Mudra Yojana | मोदी सरकार मुद्रा योजनेच्या अंतर्गत 1999 रुपये जमा केल्यानंतर 10 लाखांचे कर्ज देतंय का? जाणून घ्या सविस्तर

MLA Vinayak Mete | ठाकरे सरकारने महाराजांच्या स्मारकाला बंदी वासात टाकलंय का? – आ. विनायक मेटे