Pune Crime | हिंदुराष्ट्रसेनेच्या तुषार हंबीरवर हल्ला करणाऱ्या चौघांकडून पिस्टल, तलवार जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील (MCOCA) Mokka आरोपी आणि हिंदू राष्ट्रसेनेच्या (Hindu Rashtra Sena) तुषार हंबीर याच्यावर सोमवारी (दि.5) पाच जणांच्या टोळक्याने बंदुकीतून गोळी झाडून (Firing) तसेच हत्यारांनी वार करुन खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) करुन फरार झालेल्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी (Pune Police) 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई पाणमळा परिसरात केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल, काडतुस, तलवार आणि पालघन जप्त केले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील (Bundagarden Police Station) दोन पथके रवाना (Pune Crime) करण्यात आली होती.

 

सागर हनुमंत ओव्हाळ (वय-22), बालाजी हनुमंत ओव्हाळ (वय-23 दोघे रा. आकाशवाणी समोर, हडपसर), सुरज मुक्तार शेख (वय-21 रा. कुमार प्रॉपर्टी जवळ, हडपसर), सागर बाळासाहेब आटोळे (वय-21 रा. वडकी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर एक साथीदार फरार आहे. याबाबत तुषार नामदेवराव हंबीर Tushar Namdevrao Hambir (वय-35 रा, गोंधळेनगर, हडपसर) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कट रचणे, खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट (Arm Act) तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून तो लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) 2016 मध्ये दाखल झालेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. 2016 पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात असून 25 ऑगस्ट रोजी उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) दाखल केले आहे. त्याच्यावर रुग्णालयातील इन्फोसीस बिल्डींमधील तिसऱ्या मजल्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाच जणांचे टोळके रुग्णालयात हत्यारासह शिरले. या ठिकाणी गस्तीसाठी पोलीस नेमले होते. सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास टोळक्यातील एकाने पिस्तुल बाहेर काढले. पिस्तुलातून गोळी झाडून हंबीर याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तुलातून गोळी फायर झाली नाही. याच वेळी तलवार, कोयत्याने वार करत असताना गस्तीसाठी तैनात केलेल्या पोलीस कर्मचारी व हंबीरचा मेव्हणा शुभम रांदड हे मध्ये पडल्याने त्यांच्या हातावर वार झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्याठिकाणी गोंधळ उडाल्याने आरोपी हातातील हत्यारासह पळून गेले.

 

गुन्ह्याचे गांभीर्य़ ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar) यांनी तपास पथकाचे दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. तपास पथकाने ससुन हॉस्पीटलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे पानमळा सिंहगड रोड भागात असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने पानमळा येथे सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये आरोपींनी जुन्या भांडणातून तुषार हंबीर याच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपींवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर फिर्यादी तुषार हंबीर हा देखील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुन, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पुर्ववैमनस्यातून आणि टोळी वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपसात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे (ACP R.N. Raje)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute),
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar),
पोलीस अंमलदार मोहन काळे, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, सागर घोरपडे,
मंगेश बोऱ्हाडे, संजय वणवे, किरण तळेकर, ज्ञाना बढे, मनोज भोकरे, सतिष मुंढे, शिवाजी सरक यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pistol, sword seized from the four who attacked Hindu Rashtra Sena’s Tushar Hambir

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा