Pune Crime | पुण्याच्या लोहगाव येथील विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा; संगणक अभियंता ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीला विमानाचे तिकीट अधिकृत करण्यास विमान कंपनीने नकार दिल्याने संतापलेल्या पुण्यातील (Pune Crime) एका संगणक अभियंत्याने (computer engineer) विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा (Spreading rumors of bomb) पसरवली. या अफवेमुळे पुणे विमानतळावर (Pune Airport) एकच खळबळ (Pune Crime) उडाली. पोलीस बॉम्बशोधक पथकांसह अन्य सुरक्षा यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. विमानाची कसून तपासणी केली, मात्र, विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. रांचीला निघालेल्या विमान उड्डाणास तीन तासांचा विलंब झाला. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली.

ऋषिकेश सावंत Rishikesh Sawant (वय-28 रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हा आयटी कंपनी (IT company) नोकरीला आहे. सावंत याच्या पत्नीला रांची (Ranchi) येथे जायचे असल्याने शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता तो पत्नीला सोडण्यासाठी लोहगाव विमानतळावर (Pune International Airport) आला होता. 16 ऑक्टोबरला त्याच्या पत्नीचे परतीचे तिकीट होते. परंतु 16 ऑक्टोबर पासून विमानतळ बंध आहे. (Pune Crime)

त्यामुळे सावंत तेथील कर्मचाऱ्यांना विमानाचे परतीचे तिकीट 16 तारखेला अधिकृत करु द्या, असे सांगत होता. परंतु कर्मचाऱ्यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने रांचीला निघालेल्या विमानात बॉम्ब आहे, असे ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे विमानतळावर चांगलीच खळबळ उडाली. विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमानतळ पोलीस (vimantal police) सतर्क झाले.

पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (Bomb Squad), राज्य राखीव बलाच्या तुकड्या,
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या तुकड्याही तातडीने त्याठिकाणी दाखल झाल्या.
सावंतने सांगितलेले विमान तात्काळ बाजूला घेण्यात आले. विमानाची तीन तास कसून तपासणी करण्यात आली.
त्यावळी सावंतने विमानातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लिल वर्तन केले.
दरम्यान ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

Web Title :- Pune Crime | plane bomb lohgaon pune rumors abound airport in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात ‘बिल्डर’ अविनाश भोसले, विनोद गोयंका आणि विकास ओबेराय यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा, प्रचंड खळबळ

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,943 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rakesh Jhunjhunwala | बिगबुलने ‘या’ कंपनीत कमी केली 10% भागीदारी, केवळ 2 दिवसात विकले 8.5 लाख शेयर