Pune Crime | PMRDA कडून तिरुपती ग्रुपच्या स्वामी समर्थ डेव्हलपर्स, तिरुपती स्पर्श डेव्हलपर्स, साई गणेश डेव्हलपर्स, गोल्डन तिरुपती डेव्हलपर्स, नमो पार्क, रिव्हर व्ह्यू पार्कवर गुन्हा (FIR) दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील (Pune District) मावळ (Maval) आणि हवेली तालुक्यात (Haveli Taluka) अनधिकृत प्लॉटींग (Unauthorized Plotting) करुन जागामालक (Landlord) व विकसक (Developer) हे विक्री, विकसनाचे काम करत असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

 

त्यानुसार पीएमआरडीएने कडून तिरुपती ग्रुपच्या (Tirupati Group) स्वामी समर्थ डेव्हलपर्स (Swami Samarth Developers), तिरुपती स्पर्श डेव्हलपर्स (Tirupati Sparsh Developers), साई गणेश डेव्हलपर्स (Sai Ganesh Developers), गोल्डन तिरुपती डेव्हलपर्स (Golden Tirupati Developers) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) तर नमो पार्कवर (Namo Park) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) आणि रिव्हर व्ह्यू पार्कवर (River View Park) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53, 54, 56 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. (PMRDA files FIR against Swami Samarth Developers of Tirupati Group, Tirupati Sparsh Developers, Sai Ganesh Developers, Golden Tirupati Developers, Namo Park, River View Park)

 

तिरुपती ग्रुपच्या स्वामी समर्थ डेव्हलपर्स, तिरुपती स्पर्श डेव्हलपर्स, साई गणेश डेव्हलपर्स,
गोल्डन तिरुपती डेव्हलपर्सच्या संतोष प्रभाकर तरस (Santosh Prabhakar Taras), राजू गोरखनाथ माळी (Raju Gorakhnath Mali),
राकेश शहाजी मुऱ्हे (Rakesh Shahaji Murhe), इराण्णा रायचूरकर (Iranna Raichurkar),
कुणाल सुभाष अगरवाल (Kunal Subhash Agarwal) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर नमो पार्कच्या हरिदास धनराज भन्साळी (Haridas Dhanraj Bhansali) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणि रिव्हर व्ह्यू पार्कच्या गुलाब भागुजी चौधरी (Gulab Bhaguji Chowdhury), राहुल गुलाब चौधरी (Rahul Gulab Chowdhury)
यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती.
मात्र, त्यांनी नोटीसकडे दुर्लक्ष करत अनधिकृत विकसनाचे Unauthorized Development (प्लॉटींग) खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु ठेवले.
आरोपींनी अनधिकृत रेखांकन सक्षम प्राधिकाऱ्याच्या रितसर विकसन परवानगी व विकसन आराखड्यास मंजुरी न घेता विक्री करत असल्याचे निरीक्षणात आढळून आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापुढेही पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये सर्वेक्षण (Survey) करुन अनधिकृत विकसन करुन विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीए चे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुहास दिवसे (PMRDA Commissioner and Chief Executive Officer Dr. Suhas Divase) यांनी सांगितले.

 

नागरिकांना आवाहन
पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्लॉट खरेदी करण्यापूर्वी नागरिकांनी संबंधित विकसनास पीएमआरडीए कडून रितसर परवानगी घेतली असल्याची खात्री करावी.
तसेच मंजूर विकसन आराखडे तपासूनच प्लॉट खरेदी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय याबाबत खात्री करुन घेण्यासाठी प्राधिकरणाच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधावा असे ही आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :-  Pune Crime | PMRDA files FIR against Swami Samarth Developers of Tirupati Group Tirupati Sparsh Developers Sai Ganesh Developers Golden Tirupati Developers Namo Park River View Park

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा