Pune Crime | माओवादी संघटनेचा सदस्य अरुण भेलके याला 8 वर्षांची शिक्षा, पुणे एटीएसने केली होती अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील विशेष एटीएस न्यायालयाने (special ATS Court Pune) बुधवारी कथित शहरी नक्षलवादी अरुण भानुदास भेलके Arun Bhanudas Bhelke (वय-46) याला बेकायदा कृती (संरक्षण) कायदा अर्थात यूएपीए (The Unlawful Activities (Prevention) Amendment Act) कलम 20 अंतर्गत बंदी घातलेल्या सीपीआय (CPI) चा सदस्य असल्याबद्दल दोषी ठरवून आठ वर्षांची शिक्षा आणि 42 हजार रुपये दंडाची शिक्षा (Sentenced) सुनावली. विशेष एटीएस न्यायाधीश एस आर नावंदर (Special Judge S.R.Navandar) यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. (Pune Crime)
मुख्य शिक्षेव्यतिरिक्त, न्यायालयाने अरुण भेलके याला UAPA कलम 38 अन्वये आणि फसवणूक, बनावट कागदपत्रे वापरणे इत्यादी गुन्ह्यांसाठी सात ते पाच वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा एकाचवेळी ठोठावल्या जाणार आहेत. भेलके अटक झाल्यापासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. उज्जवला पवार (Lawyer Ujjwala Pawar) यांनी कामकाज पाहिले.(Pune Crime)
काय आहे प्रकरण?
देशभक्ती युवा मंचाच्या माध्यमातून नक्षलवादी कारवाया करणाऱ्या नलक्षलवादी नेता अरुण भानुदास भेलके उर्फ शरमन जाथय़ उर्फ संजय कांबळे उर्फ राजन उर्फ संघर्ष उर्फ आनंद याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (State Anti Terrorism Squad) पुणे युनिटने (Pune ATS) कासेवाडी झोपडपट्टी येथून अटक (Arrest) केली होती. तो संजय कांबळे या नावाने पुण्यात राहत होता. त्याच्यासह पत्नी कांचन हिलाही पोलिसांनी अटक केली. पुण्यातील मास मूव्हमेंट नावाच्या संघटनेच्या संपर्कात राहून या तरुणांना ‘अर्बन नक्षलवादा’साठी तयार करण्याचे काम तो करीत होता.
चंद्रपूर पोलिसांनी (Chandrapur Police) 2008 नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईत दहा जणांना अटक केली होती. त्यावेळी चीनी बनावटीचे एक कार्बाईन गन व 130 काडतुसे पोलिसांनी जप्त केली होती. अटक केलेल्या दहा मध्ये अरुण भेलके व त्याची पत्नी कांचन यांचाही समावेश होता. जामीन मिळाल्यापासून हे दोघेही फरार होते. भेलके हा नाव बदलून पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुणे एटीएसच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला कासेवाडी भागातून सापळा रचून अटक केली.
ही कारवाई तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त आणि त्यावेळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे (ACP Bhanupratap Barge),
पोलिस अधिकारी सुनिल तांबे, बाळकृष्ण कुतवळ, सहायक निरीक्षक सुमेध खोपीकर, नागेश भास्कर, राहूल राख,
अश्विनी जगताप, जोगळेकर, पोलीस कर्मचारी सुनिल पवार, शंकर संपते, आप्पा गायकवाड, बाळासाहेब बारगुजे,
दिनेश गडांकुश, मुकुंद देवडे यांच्या पथकाने केली होती.
Web Title :- Pune Crime | pune ats court sentences maoist operative arun bhelke to 8 years in jail
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Vaidyanath Co Operative Bank | पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ सहकारी बँकेवर आरबीआयची कारवाई
Pune PMC News | अग्निशमन सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे