Pune Crime | परदेशी चलनाच्या आमिषाने तरुणाला 3 लाखांचा गंडा; केलं ‘हे’ कृत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | स्वस्तात परदेशी चलन देण्याच्या बहाण्याने एका तरुणाला साबणाची वडी (Soap bar) देऊन लाखोचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. भामट्यांनी तरुणाला परदेशी चलन (Foreign Currency) देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडू 3 लाख 35 हजार रुपये घेतले. त्या बदल्यात आरोपींनी तरुणाला एका कागदात गुंडाळून साबणाची वडी दिली. अशा प्रकारची फसवणूक (fraud) बिबवेवाडीत घडला होता.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand police station) फिर्याद दिली आहे.
तरुणाच्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला दोन जण वाघोली (Wagholi) परिसरात भेटले.
त्यांनी गप्पांच्या माध्यमातून तरुणासोबत ओळख वाढवून स्वस्तात परदेशी चलन देण्याचे आमिष (Pune Crime) दाखवले.

तरुणाने त्या दोघांवर विश्वास ठेवला. आरोपींनी तरुणाला येरवडा (Yerawada) परिसरात भेटण्यासाठी बोलावून घेतले.
परदेशी चलन देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून 3 लाख 35 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला एका कागदात गुंडाळलेली साबणाची वडी देत फसवणूक केली.
काही वेळानंतर तरुणाने कागद उघडला त्यामध्ये त्याला परदेशी चलना ऐवजी साबणाची वडी आढळून आली.
पुढील तपास पोलीस उप निरीक्षक किरण वराळ (PSI Kiran Varal) करत आहेत.

 

Web Title : Pune Crime | pune crime foreign currency fraud of 3 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Scheme | खुशखबर ! फक्त 100 रूपयांमध्ये विकलं जातंय सोनं, जाणून घ्या कसं खरेदी करू शकता एवढया कमी किंमतीत Gold

Modi government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवणं विनामुल्य मिळणार

IBPS Recruitment 2021 | ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 1.50 लाखांपर्यत