
Pune Crime | चायनीज मांजा विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हे शाखेची कारवाई
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | संक्रांतीच्या दिवशी चायनीज मांजाचा (Chinese Manja) मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. चायनिज नायलॉन मांजा विक्रेत्यांचा शोध घेत असताना पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट पाचच्या (Crime Branch Unit-5) पथकाने एका दुकानावर छापा टाकून मांजाचे रिल जप्त केले आहेत. ही कारवाई (Pune Crime) कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली.
अब्दुल रहेमान पापा शेख (वय-65 रा. आश्रफनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर पर्यावरण कायद्यांतर्गत (Environment Act) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून 8 हजार रुपये किमतीचे 15 नायलॉन मांजाचे रिल जप्त केले आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
आपल्या परिसरात कोणी इसम अनाधिकृत प्रतिबंधीत केलेल्या चायनिज मांजा विक्री करत असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे. जेणेकरून नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास हानी पोहचणार नाही, असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam), पोलीस उप निरिक्षक अविनाश लोहोटे (PSI Avinash Lohote), पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime | Pune Police Crime branch action against shopkeeper selling Chinese manja
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…