Pune Crime | दोन वर्षापासून फरार असलेल्या पिंटू मारणे टोळीचा मुख्य सुत्रधार गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाचा प्रयत्नाच्या (Attempt Murder) गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेला आणि पिंटू मारणे टोळीच्या (Pintu Marne Gang) मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकच्या (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.28) कात्रज येथील बस डेपो (Katraj Bus Depot) समोरील सार्वजनिक रोडवर करण्यात (Pune Crime) आली. युतिन उर्फ बॉबी अरविंद पाटील Yutin alias Bobby Arvind Patil (वय-26 रा. भद्रे पार्क, उत्तमनगर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकचे पोलीस हवालदार निलेश शिवतरे (Nilesh Shivtare) व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे (Sumit Takpere) हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharati Vidyapeeth Police Station) आणि सहकारनगर पोलीस स्टेशनच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीमध्ये फरार, तडीपार, अभिलेखावरील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना माहिती मिळाली की, उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar police station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी बॉबी पाटील हा कात्रज बस डेपो समोर उभारला असून तो या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार आहे. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कात्रज डेपो समोरील सार्वजनिक रोडवर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशी दरम्यान त्याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीला उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Senior Police Inspector Ajay Waghmare), पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक गणेश ढगे, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Robbery and Anti Vehicle Theft Squad arrested pintu marne gangs leader Yutin alias Bobby Arvind Patil near Katraj Bus Depot in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा