Pune Crime | वडिलांना मारहाण करून पसार झालेल्या मुलाला व जावयाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वडिलांवर वार करुन फरार झालेल्या मुलासह जावयाला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell, Pune) अटक (Arrest) केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pune Police) अजिंक्य विनयचंद्र नाईक (Ajinkya Vinayachandra Naik), शिवा विनयचंद्र नाईक (Shiva Vinayachandra Naik), विशाल रामा कुमावत (Vishal Rama Kumawat) यांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सोमवारी (दि.20) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य नाईक, शिवा नाईक, विशाल कुमावत ( सर्व रा. फ्लॅट नंबर 101, श्रीदत्त रेसिडेन्सी आंबेगाव बुद्रुक, कात्रज पुणे) हे आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करून सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी वैद्यकीय तपासणी करून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare), सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील (API Abhijit Patil), पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav), अविनाश लोहोटे (PSI Avinash Lohote), पोलीस अंमलदार यशवंत ओंबासे (PSI Yashwant Ombase), मधुकर तुपसुंदर, पोलीस अंमलदार नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, प्रफुल चव्हाण यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests son and son in law for beating father

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा