Pune Crime | पुण्यातील मोठ्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा; जागा मालक बाळासाहेब दांगट याच्याविरुद्ध FIR (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttamnagar Police Station) हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकून 22 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई एनडीए रोड (NDA Road) वर बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये करण्यात आली. पोलिसांनी जागा मालक बाळासाहेब दांगट (Land Owner Balasaheb Dangat) याच्याविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

या कारवाईमध्ये जुगार अड्याचा मालक बाळु सीताराम मराठे Balu Sitaram Marathe (वय-51 रा. कोथरुड-Kothrud), सचिन बाळासाहेब गायकवाड Sachin Balasaheb Gaikwad (वय-38 रा. नांदेड सिटी-Nanded City), स्वप्निल दत्तात्रय गायकवाड Swapnil Dattatraya Gaikwad (वय-22 रा. बहुली ता. हवेली), राज जयंता करकेरा Raj Jayanta Karkera (वय-42 रा. भोसरी), मंगेश सुरेश काळे Mangesh Suresh Kale (वय-37 रा. बडगाव बुद्रुक), कृष्णा गोविंद लाकडे Krishna Govind Lakde (वय-31 रा. हडपसर), सुजित मेघनाथ मंडल Sujit Meghnath Mandal (रा. मांडवी, ता. हवेली), कुमार शेट्टी रायडू Kumar Shetty Rayudu (वय-54 रा. उत्तमनगर), लक्ष्मण पांडुरंग कासार Laxman Pandurang Kasar (वय-45 रा. कर्वेनगर), नरेंद्र भवरलाल राव Narendra Bhavarlal Rao (वय-30 रा. आंबेगाव बुद्रुक),

 

नितीन दिनकर मोरे Nitin Dinkar More (वय-45 रा. मंगळवार पेठ, भोर), गणेश नथु दहिभाते Ganesh Nathu Dahibhate (वय-47 रा. कोथरुड), किरण प्रकाश चौधरी Kiran Prakash Chaudhary (वय-38 रा. वारजे गाव), वनाजी चंद्रकांत साटवटे Vanaji Chandrakant Satwate (वय-44 रा. भोर), निसार सांडु सय्यद Nisar Sandu Sayyed (वय-53 रा. शिवणे), चंद्रकांत विठ्ठल कांबळे Chandrak Vitthal Kamble (वय-39 रा. वारजे माळवाडी), संतोष बबनराव माने Santosh Babanrao Mane (वय-35), ओंकार शशीकांत क्षिरसागर Omkar Shashikant Kshirsagar (वय-28 दोघे रा. केशवनगर, अकलुज जि. सोलापूर), सचिन राजेंद्र कळमकर Sachin Rajendra Kalmakar (वय-37 रा. मशालीचा माळ, ता. भोर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जागा मालक बाळासाहेब दांगट (रा. शिवणे) याच्यासह 22 जणांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार (Maharashtra Gambling Prevention Act) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

उत्तमनगर मधील एनडीए रस्त्यावर असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शनिवारी (दि.7) मध्यरात्री एकच्या सुमारास छापा टाकून 22 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल, जुगार खेळण्याचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 30 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विशेष म्हणजे या ठिकाणी जुगाराच्या क्लबसाठी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावरील पार्किंग लॉटमध्ये अनधिकृतपणे (Unauthorized) इलेक्ट्रिक कनेक्शन (Electric Connection) घेतले होते. जुगाऱ्यांसाठी याठिकाणी लाईट आणि फॅनची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच 15 टेबल आणि 65 खुर्चा लावून या क्लबमध्ये रात्रंदिवस जुगार सुरु होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar),
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, निलम शिंदे, मनिषा पुकाळे,
हणमंत कांबळे, अश्विनी केकाण, इरफान पठाण यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Pune Police Crime Branch raids gambling den in Pune; FIR against land owner Balasaheb Dangat (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा