Pune Crime | गुन्हे शाखेकडून दोन परदेशी नागरिकांकडून 5 लाखाचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोकेन (Cocaine) हा अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन परदेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकच्या (Anti Narcotics Cell, Pune) पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेले आरोपी हे टांझानिया (Tanzania) येथील असून त्यांच्याकडून 5 लाख 27 हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आहे. ही कारवाई (Pune Crime) पिसोळी कोंढवा येथे बुधवारी (दि.29) करण्यात आली.

 

अब्दला रामाधनी अब्दला Abdala Ramadhani Abdala (वय-46), राजाबु हरिरी सल्लेह Rajabu Hariri Salleh (वय-47 दोघे रा. व्हिटीपी अर्बन नेस्ट सोसायटी, उंड्री, पुणे, मुळ रा. टांझानिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) एन.डी.पी.एस. अॅक्ट (N.D.P.S. Act) अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad) हे कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. पिसोळी कोंढवा येथील आनंद मशिनरी कंपनीच्या भिंतीजवळ दोन परदेशी नागरिक दुचाकीवर संशयितरित्या कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. पथकाने दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता अब्दला रामधनी अब्दला याच्याकडे 7 ग्रॅम 120 मिलीग्रॅम कोकेन आणि राजाबु सल्लेह याच्याकडे 22 ग्रॅम 710 मिलीग्रॅम कोकेन आढळून आले. आरोपींकडून कोकेन, मोबाईल, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 5 लाख 27 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale),
पोलीस अंमलदार मारुती पारधी, मनोज साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, संदीप जाधव,
राहुल जोशी, संदिप शिर्के, विशाल दळवी, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.
पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मधाळे (API Madhale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch seized 5 lakh cocaine from two foreign nationals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत उध्दव ठाकरेंना 4 वेळा सांगितलं होतं ? जाणून घ्या

 

Airtel 365 Days Validity Plan | एक वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, मिळतील अनलिमिटेड कॉल्स; डेटा आणि SMS, ‘हा’ सर्वात स्वस्त एअरटेल प्लान

 

LIC Jeevan Umang Policy | ‘या’ स्कीममध्ये दररोज करा 45 रुपयांची गुंतवणूक, एकाच वेळी मिळतील 36 लाख