Pune Crime | पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने वार करणारी 5 जणांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | यवत गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थान (Bhairavnath Devasthan Yavat) पालखीच्या मानकरीचा मागील अनेक वर्षापासून वाद आहे. याच वादातून 6 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास किरण गायकवाड (Kiran Gaikwad) यांच्यावर पाच जणांनी हल्ला (Pune Crime) केला होता. हल्लेखोरांनी पिस्तुलाचा (Pistol) धाक दाखवून गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले होते. हा प्रकार यवत स्टेशन रोडवर (Yavat Station Road) घडला होता. या गुन्ह्यातील 5 फरार आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे.

 

सागर माधवराव दोरगे Sagar Madhavrao Dorge (वय-29 रा. यवत पाटील वस्ती, यवत स्टेशन पुणे), अक्षय ईश्वर यादव Akshay Ishwar Yadav (वय-27 रा. यादववाडी यवत), अभिषेक संतोष दोरगे Abhishek Santosh Dorge (वय-24 रा. पिंपळाची वाडी, यवत), हर्षल बाळु जगताप Hershal Balu Jagtap (वय-22 रा. कासुर्डी कामतवाडी यवत), विजय अनिल टेमगिरे Vijay Anil Temgire (वय-25 रा. भरतगाव यवत) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.23) लोहियानगर (Lohianagar) येथे करण्यात आली. (Pune Crime)

 

यवत गावच्या भैरवनाथ देवस्थान पालखीचे मानकरी वरुन किरण गायकवाड आणि सागर दोरगे यांच्यामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून वाद आहे. याच वादातून 6 फेब्रुवारी रोजी किरण गायकवाड हे त्यांच्या मित्रासोबत जेजुरी येथून देवदर्शन करुन येत असताना आरोपींनी कारमधून येऊन फिर्यादी गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. याबाबत गायकवाड यांनी ग्रामीण पोलिसांच्या (Rural Police) यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) फिर्याद दिली होती.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक बुधवारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी कारमधून (एमएच 10 एएन 0900) बाबुमामडा चौक लोहियानगर येथे मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लोहियानगर येथे सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपींना यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार,
इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, राहुल मखरे, दत्ता सोनावणे, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Unit 1 Arrest 5 Criminals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravi Rana | ‘ठाकरे सरकार पडणार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार’ – आमदार रवी राणा

 

Multibagger Stocks | 5 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, 1 लाख झाले 1.7 कोटी

 

Safe Investment Planning | ‘या’ स्कीममध्ये लावा केवळ 10,000 रुपये, मॅच्युरिटीनंतर होईल 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा?