Multibagger Stocks | 5 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, 1 लाख झाले 1.7 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stocks | शेअर बाजारात (Stock Market) सध्या घसरणीचे सत्र सुरू आहे. या घसरणीत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे, ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी दर्जेदार स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना अजूनही फायदा होत आहे. असाच एक दर्जेदार स्टॉक म्हणजे पिक्स ट्रान्समिशन (Pix Transmission), ज्याने गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत मोठा परतावा दिला आहे. (Multibagger Stocks)

 

बाजारात घसरण होण्यापूर्वी जानेवारीमध्ये या शेअरची किंमत 1,100 रुपयांच्या वर गेली होती. सध्या हा शेअर 880 प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.

 

शेअरची प्राईस हिस्ट्री (Share Price History) :
या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या 20 वर्षांत दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. 1 फेब्रुवारी 2002 रोजी BSE वर शेअरची किंमत 5.15 रुपये होती, जी 22 फेब्रुवारी 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर 880 रुपयांवर पोहोचली. अशाप्रकारे, गेल्या 20 वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 170 पट रिटर्न दिला आहे. (Multibagger Stocks)

गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, स्टॉकने सुमारे 26 टक्के रिटर्न दिला आहे. तर जवळपास वर्षभरात शेअरच्या किमतीत 168 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

महामारीनंतर पकडला वेग :
कोरोना महामारीच्या काळात शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे. ज्याचा या स्टॉकलाही फायदा झाला आहे.
महामारीच्या सुरुवातीला शेअरची किंमत 86.47 रुपये होती, जी आता प्रति शेअर 880 रुपये झाली आहे.

अशा प्रकारे, या स्टॉकने गेल्या 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 10 पट रिटर्न दिला आहे.
मात्र, गेल्या एका महिन्यात स्टॉकमध्ये 13.83 टक्क्यांची घसरण झाली आहे.

गुंतवणुकीचे कॅलक्युलेशन :

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते,
तर आज त्याची गुंतवणूक 1.70 कोटी झाली असती.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने महामारीच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर त्याची रक्कम 10.17 लाख रुपये झाली असती.

याशिवाय जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या 6 महिन्यांसाठी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची गुंतवणूक 1.26 लाख रुपये झाली.

 

कंपनी प्रोफाइल :
पिक्स ट्रान्समिशन ही एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे.
कंपनी बेल्ट आणि संबंधित मॅकेनिकल पॉवर ट्रान्समिशन प्रॉडक्ट तयार करते.
कंपनीचा व्यवसाय भारतात तसेच युरोप आणि मध्य पूर्व देशांमध्ये पसरलेला आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stocks | quality stock gave multibagger return to investers pix transmission

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा