Pune Crime | ‘कोणी पुढे यायचे नाही, आम्ही इथले भाई आहोत, खल्लास करु एक एकाला’, दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात विकास उर्फ विकी जाधवला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | टेम्पो चालकाला मारहाण (Beating) करत असताना भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना धमकावून दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला (Pune Criminals) पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे. विकास उर्फ विकी जाधव (Vikas alias Vicky Jadhav) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार 19 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील (Pune Crime) कात्रज (Katraj) येथील भारत नगर येथे घडला होता.

 

याबाबत अभिजित तुकाराम दिघे Abhijit Tukaram Dighe (वय – 35 रा. निंबाळकर वस्ती, कात्रज, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी फिर्यादी हे टेम्पो घेऊन घरी जात होते. त्यावेळी आरोपी दयानंद भीमराव सितापराव (Dayanand Bhimrao Sitaprao), त्याचा भाऊ सुमित भिमराव सितापराव (Sumit Bhimrao Sitaprao), विकी जाधव आणि त्याचे साथीदार टेम्पो समोर आडवे आले. अभिजित दिघे यांनी बाजूला होण्यास सांगितले असता आरोपींनी त्यांना लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मदत करण्यासाठी आलेल्या लोकांना ‘कोणी पुढे यायचे नाही, आम्ही इथले भाई आहे, आमचे कोणी वाकडे करु शकत नाही, कोणी पुढे आल्यास जिवंत सोडणार नाही खल्लास करु एक एकाला’ अशी धमकी (Threat) देऊन दहशत निर्माण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. तसेच पत्नी आणि मुलाचा खून करण्याची धमकी दिली. (Pune Crime)

 

दरम्यान, गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले. या गुन्ह्यातील आरोपी विकास उर्फ विकी जाधव हा पोलिसांनी पकडू नये म्हणून पुणे शहराबाहेर (Pune City) पळून गेला होता. तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी विकी जाधव हा सातारा जिल्ह्यातील (Satara District) दहिवडी (Dahivadi), फलटण (Phaltan), माण (Maan) भागात वेश बदलून वावरत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार तपास करुन आरोपीची माहिती काढली. आरोपी माण तालुक्यातील बिजवडी (Bijwadi, Taluka Maan) या भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ऋषीकेश महादेव भोसले यांच्या वावरातून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी हा रेकॉर्डवरील व अट्टल सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी (Warje Malwadi Police Station), सिंहगड रोड (Sinhagad Road Police Station), हिंजवडी (Hinjewadi Police Station) व इतर पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरीचे चार, गंभीर दुखापत सारखे गंभीर स्वरुपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, किशोर वग्गु, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Unit 2 arrest Vikas alias Vicky Jadhav

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा