Pune Crime | पुण्यातील उच्चभ्रू सोसायट्यांमधून महागड्या सायकली चोरणारे परप्रांतीय चोरटे स्वारगेट पोलिसांकडून गजाआड, 1 बुलेट आणि 33 ब्रँन्डेड सायकली जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील (Pune City) वेगवेगळ्या भागातील उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांच्या महागड्या सायकली चोरणाऱ्या (Bicycle Robbery in Pune) दोन परप्रांतीय चोरट्यांना स्वारगेट पोलीस ठाण्यातील (Swargate Police Station) तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. बुद्धदेव विष्णू विश्वास (Buddhadeva Vishnu Vishwas), जयंता हेमंतकुमार बिश्वास (Jayanta Hemant Kumar Biswas) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी (Pune Police) त्यांच्याकडून 1 बुलेट आणि 33 ब्रँन्डेड सायकली असा एकूण 7 लाखाचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

 

पुणे शहरातील स्वारगेट, भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth police station), दत्तवाडी (Dattawadi Police Station), खडक (Khadak Police Station), मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या (Market Yard Police Station) हद्दीतील उच्चभ्रू सोसायट्यांच्या पार्किंगमधून ब्रॅन्डेड कंपनीच्या सायकली रात्रीच्या वेळी चोरण्याचे प्रकार वाढले होते. स्वारगेट पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन बुद्धदेव विष्णू विश्वास (वय – 22), जयंता हेमंतकुमार बिश्वास (वय – 22 दोघे रा. बरदमान दुर्गापूर, पश्चिम बंगाल – West Bengal) यांना अटक केली. (Pune Crime)

 

अशी केली अटक
मागील काही महिन्यापासून शहरातील उच्चभ्रू सोसायट्यामधून महागड्या सायकली चोरी (Bicycle Thieves) होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. पोलिासांनी तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी सायकल चोरी केल्यानंतर तीन वेळा वेशांतर करत होते. तसेच चोरलेल्या सायकली ठिकठिकाणी पार्क करुन जागा बदलून पोलिसांची दिशाभूल (Police Misleading) करत होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी गर्दीतील रस्ते निवडून वारंवार पोलिसांना गुंगारा देत होते. पोलिसांनी आरोपींची चोरी करण्याची वेळ निश्चित करुन सगल 7 दिवस पहाटे 3 ते 5 दरम्यान सापळा रचून स्वारगेट परिसरातून बेड्या ठोकल्या.

मौज – मजेसाठी करत होते चोरी
अटक केलेल्या आरोपीपैकी बुद्धदेव विश्वास हा वेशांतर करुन उच्चभ्रू सोसायटीमधील सायकलींची रेकी करत होता. पहाटे त्याच्या साथीदारासह येऊन साथीदाराला सोसायटीच्या बाहेर टेहाळणी करण्यासाठी थांबवून तो सोसायटीमधील महागड्या सायकलचे कुलूप कटरने तोडून सायकल चोरी करीत होता. चोरलेल्या सायकली तो राहत असलेल्या चौकामध्ये नागरिकांना कमी पैशात विकत होता. सायकल विकून मिळालेल्या पैशातून मौजमजा करीत होता.

 

पळून जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक
आरोपी बुद्धदेव विश्वास याने पुणे शहरातील विविध भागातून अनेक सायकली चोरल्या होत्या. त्यामुळे तो त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. यासाठी त्याने विमानाचे तिकीट देखील (Plane Ticket) काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मूळ गावी पळून जाण्यापूर्वीच स्वारगेट पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior Police Inspector Ashok Indalkar), पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव (Police Inspector Somnath Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), दिपक जमदाडे (API Deepak Jamdade), पोलीस उपनिरीक्षक दीपक खेंदाड (PSI Deepak Khendad), पोलीस शिपाई फिरोज शेख, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर बडे, लखन ढावरे, प्रवीण गोडसे, शैलेश वाबळे, ऋषीकेश तिटमे यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pune Swargate police seize 1 bullet and 33 branded bicycles from criminals


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा