RMD Foundation | RMD फाउंडेशनच्या माध्यमातून उभारले ‘सुपर स्पेशालिटी श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल हॉस्पीटल अँन्ड रिसर्च सेंटर; शोभा धारीवाल म्हणाल्या – ‘ ‘मानवता सेवा हाच खरा धर्म’ !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – RMD Foundation | रूग्ण सेवेसारखी दुसरी सेवा नाही, रूग्णालयाच्या माध्यमातून मानवता सेवा हाच खरा धर्म आहे, असं आर. एम. डी फाउंडेशनच्या (RMD Foundation) उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारीवाल (Shobha Rasiklal Dhariwal) यांनी म्हटलं आहे.
नाशिक (Nashik News) येथे आर. एम. डी फाऊंडेशन मार्फत सुपर स्पेशालिटी रसिकलाल माणिकचंद धारीवाल हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाचा (Shri Rasiklal Manikchand Dhariwal Hospital and Research Center Hospital) लोकार्पण सोहळा पार पडला.
या लोकार्पण कार्यक्रमात शोभा धारीवाल बोलत होत्या.

 

नाशिक येथे नुकतेच आर. एम. डी फाऊंडेशनच्या (RMD Foundation) माध्यमातून 11 कोटी निधीतून 165 बेडच्या सुपर स्पेशालिटी रसिकलाल माणिकचंद धारीवाल हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal),
बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan), म. सा. आभाश्रीजी (Dr. Abhashreeji), म. सा. विभाश्रीजी (Vibhashreeji),
महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण सुमेरकुमार काळे (Sumerkumar Kale), नंदलाल पारेख (Nandlal Parekh) आदी उपस्थित होते.

”रुग्णसेवेसारखी दुसरी सेवा नाही, देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक जेवढा महत्वाचा तेवढाच कोरोनाच्या काळात रुग्णांचे जीव वाचविणारा डाॅक्टर सुध्दा महत्वाचा आहे,”
अशी भावना मंत्री छगन भूजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.
”आज जगाला शांतीचा संदेश देणा-या भगवान महावीर यांच्या शिकवणीची गरज असल्याचे म्हणत विविध पार्टीच्या राजकारण्यांनी उपस्थित आचार्य पुलकसागर महाराजांचे (acharya pulak sagar ji maharaj) शांततापर प्रवचन ऐकावे म्हणजे लोकहितार्थ कामांना चालना व अहिंसात्मक वर्तन तयार होईल,” असं आवाहन देखील भूजबळ यांनी केले.

 

शोभा धारीवाल म्हणाल्या, ”रसिकशेठ यांच्या वडिलांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
तेव्हाच रसिकशेठ यांनी ठरविले की सर्वसामान्यांना वेळेवर आरोग्य सेवा पुरवली जाईल व त्याअनुषंगाने शिरुर (Shirur) येथे भव्य रुग्णालयाची स्थापना केली होती,’ अशी आठवण त्यांनी उपस्थितांना करुन दिली.
तसेच, ”माझ्या वडिलांनी मदत मागणा-याला कधीच खाली हात परत पाठविलेले नाही,”
असं आर. एम. डी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल (Janhvi Dhariwal) यांनी म्हटलं.

 

Web Title :- RMD Foundation | Raised through RMD Foundation Super Specialty Shri Rasiklal Manikchand Dhariwal Hospital and Research Center in Nashik Shobha Dhariwal said Humanitarian service is the true religion


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा