Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक हजार लिटर गावठी दारू जप्त, दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बिबववेवाडीतील झांबरे वस्ती (Zambre Vasti in Bibwewadi) परिसरात बेकायदा गावठी दारू (Illegal Liquor Sale In Pune) विक्री अड्डयावर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Crime Branch SS Cell) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक हजार लिटर गावठी दारू जप्त केली. दारू विक्री प्रकरणात एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अनिल यशवंत गुप्ते (वय २८) आणि विजय सीताराम कट्टीमणी (वय २४, दोघे रा. अण्णाभाऊ साठेनगर, झांबरे वस्ती, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. दारू विक्री प्रकरणात शारदा किसन सोनावणे (वय ६०) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

बिबवेवाडीत अण्णाभाऊ साठेनगर (Annabhau Sathe Nagar, Bibvewadi) परिसरात गावठी दारू विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला (Pune Police Crime Branch SS Cell) मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक हजार लिटर गावठी दारू आणि रोकड असा ४० हजार ६८० रुपयाचां माल जप्त केला आहे. (Pune Police Action On Illegal Liquor Sale)

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik), उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), बाबा करपे, राजश्री मोहिते, केकाण, कांबळे, चव्हाण, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली.

Web Title : Pune Crime | Raids on village liquor outlets in Bibwewadi; One thousand liters of village liquor seized, two arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर