Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक अत्याचार; बँकेतून काढून घेतले 1 लाख रुपये, आधार कार्डचा वापर करुन काढले कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले. तिच्या एटीएमचा वापर करुन १ लाख रुपये परस्पर काढले. तसेच तिच्या आधार कार्डाचा वापर करुन कर्ज काढल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth) एका ३० वर्षाच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २००/२२) दिली आहे. त्यावरुन दिनेश अशोक वारे Dinesh Ashok Ware (वय ३१, रा. श्री समर्थ अपार्टमेंट, उंड्री पिसोळी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश वारे याने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याशी वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करुन आजपर्यंत १ लाख रुपये काढून घेतले. त्यांच्या आधार कार्ड व कागदपत्रांचा वापर करुन त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने २४ हजार रुपयांचे कर्ज काढले. त्या पैशांचा स्वत:साठी वापर करुन ते न भरता फिर्यादी यांचा विश्वासघात केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोग तपास करीत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Sexual abuse by showing the lure of marriage; Rs 1 lakh withdrawn from bank, loan taken using Aadhar card

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून विश्रांतवाडीत दांडेकर पुलावरील तुषार भोसलेचा खून

 

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला; म्हणाले – ‘तुम्ही नेमके का गेलात, ते एकदाचे ठरवा, गोंधळू नका’

 

Pune Rains | पुणे शहरात पावसाची दमदार हजेरी ! कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली; शहरात 15 ठिकाणी झाडपडीच्या घटना