Pune Crime | शिबा कुरिझ व शिबा निधी चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना उच्च न्यायालयाचा दणका ! पुणे पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले ‘हे’ आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) बोपोडी येथील शिबा कुरिझ (Shiba Kuriz) व शिबा निधी (Shiba Nidhi) या चिटफंड घोटाळ्यातील (chit fund scam) आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच आरोपींना पुण्यातील (Pune Crime) खडकी पोलीस ठाण्यात (Khadki police station) हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार खडकी पोलिसांनी चिटफंडमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले आहेत अशांनी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

पुण्यातील (Pune Crime) खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Satation) हद्दीत बोपोडी (Bopodi) येथील शिबा कुरिझ व शिबा निधी चिटफंडमध्ये अनेकांनी गुंतवणूक (Investment) केली आहे. मात्र, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी चिटफंडचे संचालक मेलुकुलम दामोदरन श्रीनिवासन (Directors Melukulam Damodaran Srinivasan), सीमा मेलुकुलम श्रीनिवासन (Seema Melukulam Srinivasan) व वरुण मेलुकुलम श्रीनिवासन (Varun Melukulam Srinivasan) यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात 406,420,34 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) मिळावा यासाठी आरोपींनी सत्र न्यायालय पुणे (Sessions Court Pune) येथे अर्ज केला होता. सुनावणी दरम्यान खडकी पोलिसांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

या अर्जावर 24 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी आरोपींनी गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास तयार असल्याचे वकीलांमर्फत न्यायालयात सांगितले.
त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना 4, 5 आणि 6 ऑक्टोबर 2021 रोजी खडकी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच पोलीस ठाण्यात हजर राहून त्यांनी केलेली गुंतवणूक दाखवण्याचे आदेश तिन्ही आरोपींना दिले आहेत.

 

खडकी पोलिसांचे आवाहन

शिबा कुरिझ व शिबा निधी, बोपोडी या संस्थेकडून ज्या गुंतवणूकदारांची फसवणुक झाली आहे.
अशा गुंतवणूकदारांनी 4, 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी खडकी पोलीस ठाण्यात हजर रहावे.
तसेच ज्यांना हजर राहता येणार नाही अशा गुंतवणूकदारांनी खडकी पोलीस स्टेशनच्या इमेल आयडीवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन खडकी पोलिसांनी केले आहे.

तक्रान नोंदवणासाठी ई-मेल – [email protected]

खडकी पोलीस स्टेशन क्रमांक – 020-25818659

Web Title :- Pune Crime | Shiba Kuriz and Shiba Nidhi Chit Fund scam accused hit by High Court Pune Police appeals to investors

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On DNA Test | डीएनए टेस्टसाठी सक्ती करणे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन : सुप्रीम कोर्ट

Tarak Mehta Ka Ulta Chashmah | ‘तारक मेहता’ फेम नट्टू काका यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन

Cold Water Bathing | रोज गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर व्हा सावध! संशोधनातून समोर आली ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या