Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोनाचा उद्रेक ! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 9 हजार 170 नवे रूग्ण; जाणून घ्या आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Covid-19) संसर्ग पुन्हा एकादा झपाट्याने वाढू लागला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर महानगरामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधीतांची संख्या आढळून येत आहे. दरम्यान वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भामुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात (Coronavirus in Maharashtra) आज (शनिवारी) दिवसभरात 9 हजार 170 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन विषाणूने (Omicran Covid Virus) धास्ती वाढवली आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज राज्यात 9 हजार 170 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, राज्यात आज 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र यामधील मुंबईत (Mumbai) 6 हजारांहून अधिक कोरोना बाधित आढळल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(Coronavirus in Maharashtra)

 

दरम्यान, मुंबई वगळता राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) आकडा तीन हजारांपेक्षा कमी आहे.
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची (BMC) अधिक चिंता वाढली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारची झोप उडाली आहे. तसेच वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे.
नुकतंच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी निर्बंधाबाबत माहिती दिली. ‘कोरोनाचे रुग्ण अधिक आढळून आल्यास राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार आहे.’ दरम्यान दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वांनीच घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.

 

राज्यात आज दिवसभरात 1445 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील अ‍ॅक्टीव्ह रूग्णांचा आकडा आता 32225 वर जावुन पोहचला आहे.
गेल्या 24 तासात 6 ओमायक्रॉन रूग्णांची वाढ झाली आहे. आता ओमायक्रॉनच्या एकूण रूग्णांची संख्या 460 वर पोहचली आहे.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | number of corona patients in the maharashtra is near to 10 thousand 9 thousand 170 new patients in last 24 hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Loan | प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी Pre-EMI आणि Full-EMI बद्दल जरूर जाणून घ्या, दोन्हीमध्ये आहे खूप फरक

 

Aadhaar Card Franchise | ‘आधार कार्ड’ची मोफत घेऊ शकता फ्रेंचायजी आणि करू शकता मोठी कमाई, जाणून घ्या कसे

Samantha Akkineni | राम चरणसोबतच्या Kissing सीनवर अभिनेत्री समांथाचे मोठं विधान; ‘लिपलॉक’चं सांगितलं सत्य