Pune Crime | धक्कादायक ! पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, देवाची उरूळीमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पहिल्या पतीच्या मुलाबरोबर झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न (Attempt To Burn Alive By Throwing Petrol On The Body) केल्याचा धक्कादायक देवाची ऊरळीमध्ये (Devachi Uruli) घडला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २८२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ लक्ष्मण वाघमारे Somnath Laxman Waghmare (वय ४०, रा. देवाची ऊरळी) याला अटक (Arrest In Half Murder Case) केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ वाघमारे हा फिर्यादीचा पती आहे. सोमनाथ याचे फिर्यादी यांच्या पहिल्या पतीचा मुलगा शेखर यास गाडीची चावी दिली नाही म्हणून चापट मारली होती. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या होत्या. त्यावेळी सोमनाथ याने रागाच्या भरात पेट्रोल आणून फिर्यादीचे अंगावर टाकून तुला आता मारुन टाकतो, असे बोलून काडी पेटून पेटवून दिले. त्यात फिर्यादी यांचे तोंडाला, डावे हाताला व छातीला भाजले आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हंबीर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Shocking! Attempt to burn alive by throwing petrol on wife’s body, incident in Devachi Uruli Loni Kalbhor Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त